Skip to main content

सांगायचे राहूनच गेले

सांगायचे राहूनच गेले

जीवनात माणसाला बरेच वेळा असा अनूभव आलेला असतो .बर्‍याच गोष्टी आपण नंतर सांगू कधीतरी अशा भ्रमात राहतो व वेळ निघून गेलेली असते आणि म्हणायची वेळ येते की सांगायचे राहूनच गेले.आई वडिलांना भरपूर सांगायचे असते पण आज सांगू उद्या सांगू किंवा सांगायला भिती वाटते मग सांगण्यासाठी आईवडिल हयात नसतात व  वेळीच त्यांना  सांगितले असते तर बरे झाले असते असे त्यांना वाटते.बर्‍याच वेळा आपण खोटं बोलतो खरंसांगायचं असत पण हिंमत होत नाही तेव्हा खरं सांगायचं राहूनच गेलं असे त्याला वाटतं.काही वेळेला आपल्याला कुणीतरी आवडते पण सांगायची हिंमत होत नाही मग आयुष्याच्या शेवटी म्हणायला होत की  ते सांगायचं राहूनच गेलं .काहीवेळा चुकीची गोष्ट आपल्या हातून घडते पण कोण काय बोलेल म्हणून आपण खोटं बोलतो व खरं सांगायचं राहूनच जातं.वरवर आपण दूसर्‍याची प्रशंसा खोटीखोटी करतो पण त्याबद्दल खरं सांगायचं राहूनच जाते.काहीवेळा उशिर झाला तर आपण का उशिर झाला म्हणून थाप मारतो तेव्हा खरं सांगायचं राहूनच जातं.एखाद्या मित्राजवळ माफी मागायची असते पण तो मित्र गेल्यावर मात्र ती माफी मागायची राहूनच जाते.बायको राब राब राबते तिची जीवनभर काहीजण किंमत करत नाहीत .ती गेल्यावर मात्र तिची हौस करण्याची राहूनच गेली असे वाटते. आईवडिलांनी खूप कष्ट करून मोठे केलेले असते पण त्यांची सेवा करायची राहूनच गेली असे ते गेल्यावर वाटते.मुलांशी खूप खेळायचे असते गप्पा मारायच्या असतात पण कधी मोठे झाले ते कळतंच नाही व शेवटी त्याच्यांशी खेळायचं राहूनच जातं.
      माणसाजवळ पैसा खूप असतो पण मदतीचा हात  कुणालाच देत नाही पण आयुष्याच्या शेवटी त्याला वाटतं की त्याला मदत करायचं राहूनच गेलं पण वेळ निघून गेलेली असते. मुलांनी चुकीचं काही केलं की काहीजण त्यांचे तोंड बघत नाही पण मरतांना मात्र त्यांना माफ करायचं राहूनच गेल असे वाटते .म्हणून सांगतो राहूनचं गेल असे बोलायची वेळ येवू नये यासाठी कुणाचा विचार न करता वेळेवर सर्व करा .समोरच्याला आनंद वाटणार व स्वतालाही  वाटणार  व पश्चातापाची वेळंच येणार नाही .नाहीतर जीवनभर दु:खी राहणार व बोलतं बसणार सांगायचे राहूनच गेलं .बघा जमतं का

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...