लोभ
तुला बघितलंअन बोलावसं वाटल।
तु बघितलं अन न बघीतल्या सारखं केलं।।
बोलल्यावर तुझ्याशी मैत्री करावीशी वाटलं।
तु मात्र लक्ष न दिल्यासारखं केलं।।
मैत्री झाल्यावर तुझ्या प्रेमात पडलो।
पण तुला मात्र मी वेडा वाटलो।।
प्रेमात पडल्यावर लग्न करावसं वाटलं।
पण तुला ते खरचं नाही वाटतं राहिलं।।
लग्न झाल्यावर मला फिरावसं वाटलं।
तुला मात्र आईपणाचं स्वप्न पडायला लागलं।।
तुझ्या हातचं जेवण आवडायला लागलं होते।
तुला मात्र झोपेचे डोहाळे लागले होते।।
मला दिवसेदिवस तरूण वाटायला लागलं।
तुला मात्र पोराबाळात रमावसं वाटलं।।
मी रोज रात्रीची वाट बघतो।
तुला मात्र वाटतं मी टाईमपास करतो।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment