वाट चुकलेला प्रवाशी
बर्याच वर्षानी सापडत नव्हते
आपले जवळचे माणसे।
म्हणून जीवनात लागत नव्हते
शांती अन सुखाचे कणसे।।
किती आनंदाने हुरळून
गेलो त्या खास दिवशी।
संचारला होता उत्साह
नाही बनलो त्या दिवसापासून आळशी।।
अचानक काय होते मला
काहिच कळतं नाही।
उगाचच हट्ट करतो
कळतं पण वळतं नाही।।
केला बदल स्वतामध्ये
आलेल्या बर्याच अनुभवावरून।
झालो मी समजूतदार
राग धरणार नाही कधी चुकून।।
सर्व मला करतील माफ
कारण आहेत तुम्ही माझेच माणसं।
तुम्हाला विसरणे शक्य नाही
कारण तुम्हां सर्वामध्ये आहे काही खास।।
परतलो आता पुन्हा घरात
परत जाण्यासाठी नाही।
वाटतो आज आनंद फार
दु:खाचा लवलेशही नाही।।
होतो मी ग्रुप बाहेर
यायची आठवण फार।
शरीराने फिरत होतो
आठवत नव्हते कोणते वार।।
देवाकडे करतो प्रार्थना
अशीच सुबुध्दी दे मला।
मी एक पामर बापुडा
लागला मित्रांचा लळा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment