माणसा माणसा कधी
होशील तू माणूस।
दिले देवाने तुला बुध्दी
सांग खरंच कधी वापरलीस।।
चांगले विचार चांगले मन
कधी होईल का तुझे।
विचार करून देवाने
बनविले शरीर तुझे।।
दे सर्वाना चांगले
तुझ्याजवळील ज्ञान।
ठेवतील आदर्श तुझे
होईल चांगले त्यांचे मन।।
नको काढू कुणाच्या
आई बहिण।
इंग्रजी पण आहे
मराठीची बहिण।।
शिकला सवरला
आई वडिल फार आनंदले।
नको करू वाईट विचार
समाजाने भरपूर तुला दिले।।
नको ते आचरट विनोद
असू दे तुझ्याजवळ।
पसरतात सारे सर्विकडे
समाजात चढतो घाण मळ।।
तुझ्याकडे बघून देवाला
नको येवू देवू पश्चाताप।
त्याने नव्हता केला विचार
येईल त्यालातुझ्यामूळे ताप।।
प्रा.दगा देवरे
Comments
Post a Comment