विश्वासाला उपमा द्यायची असेल तर काचेची .एकदा काच तुटली तर पुन्हा जोडणे अशक्यच तसेच एकदा विश्वास तुटला तर पुन्हा निर्माण होणे अशक्यच .आपण एखाद्यावर एवढा विश्वास ठेवतो की स्वतापेक्षाही जास्त.त्या विश्वासावर आपण काहीही करायला तयार होतो.बरेच त्रास सहन करून त्यासाठी रिस्क उठवतो.पण बर्याच वेळा आपला विश्वासघात होतो तेव्हा प्रचंड त्रास होतो .जगण्याची उमेद नाहीशी होते.स्वतावरच राग येतो .माणूस कोलमोडतो मग त्या माणसाला धडा शिकवण्यासाठी मन विविध विचार करू लागते.ज्याच्यावर एवढा जीव टाकला तोच माणूस बदलला मग जगावरचाच विश्वास उडून जातो.माणूस मग कशावर विश्वास ठेवायला तयार नसतो.अंध विश्वास हा कधीही घातक असतो .पटकण आपण विश्वास ठेवतो व फसतो मग पश्चाताप येतो.काहीवेळेस पंधरा वीस वर्ष मित्राबरोबर घरच्याबरोबर राहूनही विश्वास संपादन करू शकत नाही किंवा एवढे वर्ष विश्वास असल्यासारखे वाटायला लागते व एक दिवस असा येतो की विश्वास नावाला सुध्दा राहात नाही.काही वेळा विश्वासाने एखाद्याला पैसे देतो पण काही दिवसांनी पैशासाठी तोच धोका देतो.पैशांसाठी नोकर लोक मालकाचा विश्वास तोडतात.संपत्तीसाठी भाऊ भाऊ बहिणी बहिणी एका क्षणात विश्वास तोडतात. मुले आईवडिलांचा विश्वास मातीमोल करतात.विद्यार्थी शिक्षकांचा विश्वास तोडतात.सरकार जनतेचा विश्वास तोडताना दिसते.नोकरशहा सरकारचा विश्वास तोडते.शेजारी राष्र्ट असो की घरा शेजारी असो ते ही क्षुल्लक कारणाने विश्वास तोडतात.काही वेळा नवर्यावर बायकोचा विश्वास नसतो किंवा नवर्याचा तिच्यावर नसतो.काहिचा देवावरचा विश्वास उडून जातो.बर्याच वेळा खरे वागून आपल्या वाटेला दु:खच येते तेव्हा खर्यावरचा विश्वास उडून जातो.काहीचा डाॅक्टरवरचा विश्वास उडतो.अशाप्रकारे विश्वास कमी किंवा अजिबात नसण्याचे अनेक कारणे आहेत व विश्वास उडाल्यामुळे बर्याच संकटांचा सामना करावा लागतोकिंवा जीवन उध्वस्त होते.
विश्वासघात अनेकांनी केला असेल पण स्वतावरचा विश्वास उडणे म्हणजे सर्वात वाईट त्यातून सावरणे महाकठिण.स्वतावरचा विश्वास कधीही ढळू देवू नये .स्वतावर विश्वास असला की मग कुणीही कितीही विश्वासघात केला तरी फरक पडत नाही बघा विचार करा व तुम्ही कुणाचा विश्वासघात तर केला नाही ना?
प्रा .दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
विश्वासघात अनेकांनी केला असेल पण स्वतावरचा विश्वास उडणे म्हणजे सर्वात वाईट त्यातून सावरणे महाकठिण.स्वतावरचा विश्वास कधीही ढळू देवू नये .स्वतावर विश्वास असला की मग कुणीही कितीही विश्वासघात केला तरी फरक पडत नाही बघा विचार करा व तुम्ही कुणाचा विश्वासघात तर केला नाही ना?
प्रा .दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments
Post a Comment