Skip to main content

वचन

वचन
नका देऊ वचन कुणाला
पूर्ण करणे असते अवघड।
प्रयत्न  करतो असे म्हणा
पुढे नाही होणार परवड।।

आपण म्हणजे राम नाही
तेवढी सहनशक्ती आहे कुठे।
म्हणून नका देवू कुणाला शब्द
कारण आपण नाहीत तेवढे मोठे।।

वचन न पाळल्याने दुखावतात लोकं
उडतो विश्वास त्यांचा तुमच्यावरी।
जपून वापरा अनमोल शब्द
नाही पडणार तुमच्यात  दरी ।।

वचन म्हणजे नसते तोंडाची वाफ
असते ते विश्वासाचे प्रतिक।
ते पाळणे असते फार कठिण
व्हावे लागते आतून मतिक।।

फेकला शब्द म्हणजे वचन नसते
वचन म्हटलं की आठवतो राम।
ते नसते शब्दांची जुळवाजुळव
आपण मात्र शब्द देवून साधतो काम।।

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...