Skip to main content

दारू

दारू

दारूचे नाव जरी काढले तर संताप येतो कारण माझ्या बरोबरीचे हूशार मित्र शिकले सवरले पण दारूड्या मित्रांच्या नादी लागून स्वताच्या आयूष्यांचा खेळखंडोबा करून घेतला स्वता तर ऐन तारुण्यात गेले व पोराबायकोला आईवडिलांना  दु:ख देवून गेलेत.दारूची चटक शरिराला लावून घ्यायची व सूटत नाही अशा बोंबा मारत फिरायचे .शिक्षणाचा उपयोग ती सूटण्यासाठी काहीही होत नाही मग इकडे जा तिकडे जा ती सोडण्यासाठी पण ती सूटत नाही.जोपर्यंत मनाने ठरवत नाही तोपर्यंत ती सुटूच शकत नाही आजचा माणूस एवढा कमकूवत झाला की त्याला दारू सोडण्यासाठी केंद्रावर जावं लागते .त्याला स्वताहून सोडता येत नाही .दारूमुळे किती लोक बरबाद झालेत .यामध्ये सुशिक्षित लोकांचा जास्त भरणा आहे कारण नोकरी असल्यामुळे पैसा खुळखुळतो मग घरात कुणाचाच धाक नाही.बाप आई बायको भाऊ बहिण मुले यांचा कोणताही विचार न करता फक्त दारू ढोसत बसायची व घरी आल्यावर तमाशा करायचा .घर हे नरक बनवायचे .त्या रात्री पुरता सांगायचे की आजची शेवटचीच पुन्हा नाही घेणार .परत दुसर्‍या दिवशी तेच रडगाणे.दारूमुळे सदविवेकबुध्दी नाहीशी होते . कर्जबाजारीपणा वाढतो .याच्याकडे हात पसरव त्याच्याकडे पसरवं मग मित्रमंडळीही अशा माणसाला टाळायला लागते त्याच्याबरोबर राहणे म्हणजे आपलीही इज्जत कमी करून घेणे.मग सर्व त्याच्या पासून पळ काढतात आपण
काय बोलतो व कुणाला बोलतो याचेही भान  त्याला उरत नाही.नोकरीच्या ठिकाणी दांड्या पडतात व सर्व दारूड्या म्हणून बघतात आणि सर्व इज्जत मातीमोल होते.माणूस म्हणून जन्माला आला आहेस ना मग कर ना तिच्यावर मात बिचारे बायका पोरांवर कशाला हवी मात .खरंच गटस असतील तर कर तिला दूर पण नाही तिच्यासाठी पूर्ण कुटूंबाचा नाश करायला निघतो दारूबाज व संपत्तिचाही नाश करतो .दारूमुळे सर्व शरीर रोगीष्ट  होते व एक दिवस ते शरीर ही संपते व दारूपुढे माणूस हरतो व सर्वाना हरवायला भाग पाडतो . दारू पिणे व दारूड्या होणे यात खूप फरक.काहीजण गांजाची नशा करतात काही तंबाखूची तर काही गुटख्याची करतात.देवाचे नाव घ्यायची नशा फार कमी लोकांना .चांगल बघायचे चांगले वाचायच व चांगले ऐकायची नशा ही फार कमी जणांना असते.दुसर्‍याला मदत करणे ही पण नशा असते .खरे बोलणे हीपण नशा.कुटूंबात वाद नको ही पण नशाच असते .चांगल्या गोष्टीची नशा असली की प्रगती होते .बघा विचार करा तुम्हाला कोणती नशा आहे?

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...