Skip to main content

शिक्षण

शिक्षण
आपण सर्वजण शिक्षणाकडे नोकरी मिळण्याच्या हेतूने बघत असतो किंवा धंदा करता आला पाहिजे.शिक्षणाने तर नोकरी किंवा धंदा करताच आला पाहिजे पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे शिक्षणाने माणसाला माणूस व त्यात माणूसकी आली पाहिजे .शिक्षणाने त्याच्यातील पशूवृत्ती नाहिशी झाली पाहिजे .प्रत्येक ठिकाणी शिक्षण दिसून आले पाहिजे.कसे बसावे कसे चालावे काय बोलावे कुठे बोलावे कुणाला बोलावे कुणाशी वाद घालावा का घालावा कुठे कसे कपडे घालावे  कसे जेवावे  याचा सारासार विचार शिक्षणाने आला पाहिजे.शिक्षणाने माणसाची विचार करण्याची दिशा बदलली पाहिजे .नाहीतर मोठे शिक्षण घेतलेला माणूस साधे बांधावरून किंवा घरावरून किंवा मुलाबाळांच्या भांडणावरून किंवा घरच्या लोकांना आईबहिणीवरून शिव्या देतात.स्वता मुख्याध्यापक असून  आईवरून शिव्या देताना ऐकले मी. मग त्या शिक्षणाचा उपयोग काय .फक्त पगार कमवण्यासाठी.एखाद्या वेळेस तोल सुटला ते समजू शकतो पण कायम यांच्या तोंडात शिव्या तसेच तंबाखू खावून घराच्या खिडकीतूनच पिचकार्‍या मारणे.दारू पिऊन नंगानाचपणा करणे सिगारेट पिणे स्टाईलमध्ये हेच जर शिक्षणाने साध्य होत असेल तर त्यांच्यापेक्षा अडाणी माणसे बरे .शिक्षणामुळे नम्रता न येता दुसर्‍याला तुच्छ लेखणे येत असेल तर ते शिक्षण शून्य.बरेच शिक्षित लोक डिप्रेशनमुळे आत्महत्या करतात.शिक्षणाने समस्यातून मार्ग काढता आला पाहिजे.शिक्षणाने नम्रता आपूलकी week लोकांना मदत करण्याची वृत्ती आली पाहिजे .मीव माझे कुटूंब ही संकुचित भावना जावून विशाल दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे.कोणते पदार्थ खावेत कीजे शरिराला उपयोगी आहेत व कोणते खावू नयेत ही जाणीव निर्माण झाली पाहिजे
      पण हे सर्व गुंडाळून पैशांचा दूरूपयोग होताना दिसतो आहे .शिक्षणाचा खरा अर्थ लोप पावला आहे .बघूया शिक्षणाने आपल्यात काय काय बदल झाला

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...