राम व कृष्ण
देवाने दोन वेगवेगळ्या युगांमध्ये अवतार धारण केला राम व कृष्ण च्या रूपाने पण दोघामध्ये फरक भरपूर रामाचा जन्म दुपारी बारा वाजता तर कृष्णाचा रात्री बारा वाजता .राम एकवचनी व एकपत्नी तर कृष्णाच्या बाबतीत सोळा सहस्र नारी बाळ ब्रम्हाचारी.रामाचा जन्म महालात तर कृष्णाचा तुरूंगात .रामाने प्रत्यक्ष युध्द केले तर कृष्णाने स्वता युद्ध केले नाही राम म्हणजे दिवस तर कृष्ण रात्र .राम सहनशील तर कृष्ण सहन न करणारा .राम म्हणजे आचार तर कृष्ण म्हणजे विचार.दोघात साम्य म्हणजे स्वता दोघांनी आपआपल्या शत्रूंचा नाश स्वता केला.रामाने कधीही सांगितले नाही की मी देव आहे पण कृष्णाने पदोपदी अर्जुनाला हेच सांगितले की मी स्वता देव आहे व मलाच भज आणि शरण ये मी सर्व दू:खातून तुझी मुक्तता करीन.रामाने कधी उपदेश केला नाही पण कृष्णाने अर्जुनाला ऊपदेश करून समस्त जगाला गीतारूपी अमृत पाजले व आज तीच गीता जीवन जगण्यासाठी मार्गदर्शिका झाली आहे .रामाला दोनच मुले झालीत तर कृष्णाला त्याच्या विरोधी .किती झाली गणता नाही.रामाने कधीही देवत्व दाखवले नाही पण कृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवून मीच खरा देव आहे हे सिध्द केले.कृष्णाचे सैनिक म्हणजे वीरयोध्दे तर रामाचे सैनिक म्हणजे वानरसैन्य.लहाणपन रामाचे अगदी मजेत गेलेत तर कृष्णाने लहाणपनीच अनेकांचा काटा काढला .तरूणपणी रामाचे जीवन वनवासात गेले तर कृष्णाचे राजमहालात.राम गोरा तर कृष्ण काळा .राम शंकराची भक्ती करायचा तर कृष्णाची भक्ती इतर लोक करायचे .रामाने स्वताचा शेवट शरयू नदीमध्ये झोकून केला तर एका पारध्याचा चूकून बाण कृष्णाच्या पायाला लागला व तेथेच तो अदृश्य झाला .कुणालाही दिसला नाही .राम प्रौढांना जवळचा वाटतो तर कृष्ण बाळगोपाळांना जवळचा वाटतो
अशा प्रकारे राम व कृष्ण यामध्ये फरक आहे .दोघांचे आचार व विचार जीवन जगण्यासाठी प्रेरक ठरतात
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment