सहनशक्ती
शिकायची असेल सहनशक्ती
तर मुंबईकडून शिकावी।
होऊन जाते आपल्याला सवय
समस्या कुणाला विचारावी।।
जिकडे तिकडे गर्दीच गर्दी
नुसते बघत त्यांच्याकडे बसावे।
मुंग्यासारखी माणसे पुढे चालतात
एक एक पाऊल पुढे सरकत जावे।।
बस असो रिक्षा असो की ट्रेन
सर्वकडे दिसतात माणसांच्या रांगा।
कुणी कुणाशी बोलत नाही
पण सर्वजण करतात त्रागा।।
सहन करतात निमूटपणे सर्व
कारण इलाज नसतो त्यांच्याजवळ।
कोण कुणाचा वाली नसतो
सर्वाची असते नुसती धावपळ।।
मुंबईने वाढवली सहनशक्ती
ती कुणाजवळ कधी नव्हती।
काहीच माहीत कुणाला नव्हते
अशी कशी झाली ती सोबती।।
जो तो नुसता धावत असतो
कारण कुणाला माहीत नसते।
ट्रेन बस मोकळी जरी मिळाली
तरी त्याला धावतच चढायचं असते।।
करतो देवाकडे प्रार्थना
नको रे बाबा ही मुंबईची गर्दी।
दे निवांत असे ठिकाण
जेथे नसेल कुणाची वर्दी।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment