गणराया गणराया
करा गजर गणराया गणराया
वंदन करा त्याच्या पाया
देईल तुम्हाला भरपूर माया
मागा त्याच्याकडे निरोगी काया।
बुध्दिचा आहे तो खरा दाता
कोणती शंका घेऊ नका आता
धावत येईल तो भक्तांचा अनंता
आहे तो खर्या भक्तिचा भोक्ता।
संकट तो आता सर्वांचे निवारील
सुख शांती घ्या असे तो म्हणेल
खर्या भक्तांना तो जरूर भेटेल
जे जे चांगलं आहे ते ते तो देईल।
त्याची करा मनोभावे पूजा
नका करू कोणता गाजावाजा
दहा दिवस भरपूर येईल मजा
माफ करेल तो तुमची सर्व सजा।
गजानना गजानना करतो तुला प्रार्थना
तुझ्याविना कोण आहे आम्हा जना
सुख शांती प्रदान कर आमच्या मना
तुचं तर विश्वाचा खरा राणा।
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment