बदल आणि मी
बदल हा तर निसर्गाचा नियम आहे. सतत प्रत्येक गोष्ट बदलत असते .आज जे आहे ते उद्या कदाचित नसणार व हे बदल बर्याच वेळेला खूप वेगाने होतात तर काही संथ गतीने होतात.आपण जन्माला आल्यावर आपली झालेली वाढ ही आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही पण काही दिवसाने लोकांना वाटते की याची उंची वाढली .पण कधी व कशी व केव्हा वाढते हे स्वताला नाही सांगता येत .आपल्या शरीरातील पेशी दर सेकंदाला किती मरतात व नवीन किती जन्माला येतात हे आपण प्रत्यक्ष बघू शकत नाही पण ते शरिराच्या आत ते घडत असते व त्याचा थांगपत्ता आपल्याला नसतो व आपल्या मनात उद्याची चिंता असते.आपण अन्न खातो पण त्यापासून काय काय तयार होते याचा आपल्याला थांगपत्ता नसतो वते आपोआप कार्य आत चालू असते.आॅक्सिजन घेणे व कार्बनडाय सोडणे हे सुध्दा आपोआप चालू असते आपली इच्छा असो किंवा नसो ते चालूच असते .किती रक्त शुध्द करायचे हे सुध्दा आपोआप होत असते .आपल्या शरिरामध्ये जे चालू आहे ते सुध्दा आपल्या हातात नाही तरी माणूस म्हणतो मी केले माझ्याशिवाय कुणिच करू शकत नाही.तुझ्या शरिरामध्ये काय चालू आहे हे सुध्दा तुला माहित नाही मग बाकी बढाया मारून काय उपयोग? झोपे मध्ये आपण स्वताहून विचार करत नाही .बर्याच वेळेला चांगली स्वप्ने पडतात व त्यात आपण कुठे कुठे कुणाबरोबर फिरत असतो व असे दिसणे आपल्या हातात नाही.मग आपल्या हातात आपले काय आहे.आपला जन्म व मरण ही नाही.फक्त आठवणि आपल्या हातात असतात.उद्या आपल्याला कुठे जावे लागेल हे पण फिक्स नसते .आपण ठरवतो त्यापेक्षा वेगळेच काहीतर घडते की ज्याची कल्पनाही आपण केलेली नसते.म्हणजे आपल्या हातात किती गोष्टी आहेत व किती नाहित याचा विचार करा व उगीच भ्रमात राहू नका की आपण कुणीतरी आहोत व आपल्या शिवाय पान ही हलणार नाही.किती आले अन गेले त्याविन जग काय ओसचि पडले.बघा विचार करा व स्वताच्या विचारात बदल घडविता येईल का ? व जमत असेल तर बघा
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment