Skip to main content

माणूस विधात्याच्या हातातली कटपुतली

माणूस एक कटपुतली

माणसा माणसा का करतोस गर्व
तुझ्या हातात बरेच नाही काही।
वाट पाहणे हेच तर असते बघणे
असचं आहे माणसा सर्वकाही।।
कारण माणूस आहे एक कटपुतली

जन्म नाही अन नाही मरण हाती
उद्या कसा येईल हेही नाही कळतं।
तुझं भविष्य नाही माहीत  तुला रे
उद्या कोण भेटेल हेही नाही माहीत।।
कारण माणूस आहे एक कटपुतली

पैसा येईल पैसा जाईल
माणूस असेल  अन नसेल माणूस।
काहीच नाही सांगता येणार
जीवन एवढं क्षणभंगूर कस।।
कारण माणूस आहे एक कटपुतली

निसर्गात होतात काय काय बदल
तोंड देत राहायचं असत।
बर्‍याच वेळा होतो माणूस हतबल
सूचतं त्याला काहीच नसतं।।
कारण माणूस आहे एक कटपुतली

आज आहे महालात तर उद्या तुरूंगात
क्षणात स्वर्गाचं होतं नरक।
नसते कधी केलेले कोणते पाप
तरीही सुख नसतं सारखं।।
कारण माणूस आहे एक कटपुतली

क्षणात गरीबीचा होतो श्रीमंत
तर श्रीमंताचा होतो गरीब।
अवतीभोवती असतो मित्रांचा गराडा
कधी मात्र रूसतं स्वताचं नशिब।।
कारण माणूस आहे विधात्याच्या हातातली कटपुतली

प्रा. दगा देवरे
रुपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...