देव हरवला
देव हरवला देव हरवला।
असा कसा दिसेनासा झाला।।
फिरलो मी मंदिर मशिदीत।
पण शोध घेऊनही नाही सापडत।।
तिर्थस्थानी शोधले मी त्याला।
तेथेही नाही गवसला मला।।
मग बाबा बुवाकडे गेलो।
तेथे तर लुबाडलो गेलो।।
माणसात मी शोधण्याचा केला विचार।
पण बिघडलेले दिसले त्यांचे आचार।।
त्याला शोधण्यासाठी टाहो मी फोडला।
पण त्याचा आवाजच नाही आला।।
देशात गुंडगिरी अत्याचाराने सीमा गाठली।
म्हणून त्याला शोधण्यासाठी विविध ठिकाणे शोधली।।
कुणालाच त्याचा धाक नाही वाटत।
म्हणून तर बलात्कार खून चोरी करत सुटलेत।।
कुठे हरवला कुठे हरवला आपला देव।
सांगा ना काय आहे त्याचे खरे नाव।।
धावत येऊन कर शांतता प्रदान।
अन खत्म कर आजचे कलियुगाचे रावण।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment