नसते जेव्हा घरी तू
नसते जेव्हा घरी तू
घर उठते खायला।
मन होते सैरभैर
शांती नाही वाटतं जीवाला।।
नसते जेव्हा घरी तू
घरंही असतं अबोल।
ते ही बघते वाट तुझी
चार भिंतीत वाटते कोंडलेल।।
नसते जेव्हा घरी तू
होते खाण्याची आबाळ।
भूकेने होतो कोंडमारा
नाही सरत वेळ।।
नसते जेव्हा घरी तू
वाटते सारखे उदास।
जातो सर्व उत्साह
जाता जात नाही दिवस।।
नसते जेव्हा घरी तू
किचन पडते भकास।
काय सांगू तूजला
अंत आता पाहू नकोस।।
नसते जेव्हा घरी तू
मन नाही लागतं कुठे।
सारखे आजारी वाटते मला
तू नसल्याने जाणवतात तोटे।।
नसते जेव्हा घरी तू
किटकांचा असतो वावर।
पुरी झाली ही परिक्षा
नाही मन राहत थार्यावर।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment