अनोळखी माणसे
रोज दिसतात शहरात
अनोळखी माणसं सारे।
कधीतरी भेटतो ओळखीचा
वाटते मनाला बरे।।
ट्रेन बसमध्ये गर्दीच गर्दी
नसते जागा पाऊल ठेवायला।
जशा कोंबड्या कोंबलेल्या
शांती नाही लागतं मनाला।।
कुठून येतात रोज नवे चेहरे
करतात प्रवास एकत्र।
नसते कशाची विचारपूस
राहतात स्व:तात मग्न मात्र।।
जमते कधीतरी कुणाशी मैत्री
अनोळखी जगात वाटतो दिलासा।
मग जमते गप्पांची मैफिल
काही वेळात होतो दिसेनासा।।
लोक सारखे धावत असतात
कारण कुणाला माहीत नसते।
शरीराला झालेली असते सवय
म्हणून स्व:ताला विसरायला होते।।
शहरात विश्वास ठेवणे अवघड
कोण फसविल सांगता येत नाही।
वागावे लागते सावधपणे
शांती फार काळ टिकत नाही।।
पोटापाण्यासाठी लोक येतात शहरात
तेथेच आपले वसवितात घर।
बरेच विसरतात गावाला
कारण पडून गेलेले असते घर।।
शहर हिच झाली आता कर्मभूमी
जे करायचे ते शहरातच करतात।
गावाच्या लोकांना असते आकर्षण
शहरातले लोक सुट्टीत गावाला निघतात।।
प्रा. दगा
Comments
Post a Comment