Skip to main content

घर

घर
घर म्हणजे नुसते विटा
मातीच्या भिंती नसतात
तेथे आपल्या जीवनाचे
प्रेमळ माणसे असतात

घर म्हणजे नुसता
राहण्यासाठी निवारा नसतो
स्वप्न  पूर्ण करण्यासाठी
तेथे असणार्‍यांचा पाठिंबा असतो

घर म्हणजे नुसती
झोपण्याची जागा नसते
तर मन व शरीराला
उभारी येण्याचे ठिकाण असते

घर म्हणजे माणसाचे
जीवनाचे असते मंदिर
तेथे असतो खर्‍या
माणसारूपी देवांचा वावर

घर म्हणजे असते
सर्वांत चांगले शांतीचे ठिकाण
हेच तर असते खरे
माणसाचे विश्रांती स्थान

घराकडे लोकांना असते
कायम जायची घाई
कारण घरात नांदत
असते आईरूपी रखुमाबाई

स्वातंत्र्याचा खरा उपभोग
घेतो  आपणआपल्या घरात
तेथे असतो आपण मालक
म्हणून असतात सर्व आनंदात

घर म्हणजे झोपडी
असते तरी चालते
घरामधील लोकांमध्ये असावे
प्रेमाचे आपुलकीचे विश्वासाचे नाते

प्रा. दगा देवरे

Comments