पितरचा महिना
आता पितरांचा महिना चालू झाला व सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम दाटून येते व त्यासाठी कुणी तिर्थस्थानी जातात त्यांना जेवू घालण्यासाठी .पुजापाठ करून पैसे भरून पितरांना जेवण्याची सोय करतात व स्वताला धन्य मानतात आता ते त्यांच्यापर्यंत पोहोचते का हा वादाचा प्रश्न आहे पण जीवाला तेवढंच समाधान .ज्या माणसांनी जिवंतपणीच आईबाबांची सेवा करून त्यांना समाधान दिले असेल तर मग पितर घातले काय व न घातले काय फरक काही पडणार नाही.पण ज्यांनी जीवनात कधी त्यांची सेवा केली नाही .कळजी घेतली नाही .कसे आहेत असे प्रेमाचे शब्दही बोलले नाहीत .कधी त्यांच्याशी दोन चांगले शब्द बोलले नाहीत .त्यांना काय हव व काय नको हे ही कधी विचारलं नाही .त्यांच्या संपतीवर मात्र लक्ष ठेवले व हडपही केली व त्यांना दारोदार हिंडायला लावले .एखादी औषधाचीही बाटली मागितली असेल तीही आणून दिली नसेल .कधी फिरायला कुठे नेले नसेल .आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीवही नसेल .जीवंतपणी शिवीगाळ दिली असेल .एखादा नवीन कपडा आणून दिला नसेल अशा माणसांना ते गेल्यावर जेवण दिले जाते पितर म्हणून तर सर्व हास्यापद आहे .अशा कर्मकाडांना कवडीचीही किंमत नाही .जे करायचे ते जिवंतपणीच करा .मग कुठे तिर्थाला जाण्याची गरज पडणार नाही .त्यांच्याशी जिवंतपणी बोला त्यांना वेळ द्या .लांब असतील तर फोनवर बोला त्यांची काळजी करा त्यांना हवे ते नको पहा .त्यांना आनंद द्या .नवीन कपडे देऊन सरप्राईज द्या .कधी नाटकाची किंवा चांगल्या सिनेमाची तिकिटे द्या .फिरायला न्या.त्याच्या इच्छा विचारा व त्या पूर्ण करा .थोडा वेळ त्यांच्या शेजारी बसा व आॅफिसच्या गमतीजमती सांगा .शेतकरी असाल तर त्यांचा सल्ला घ्या व त्यांना मान द्या .त्यांचे कोणतेही महत्व कमी झालेले नाही अशी जाणीव निर्माण करा .प्रत्येक निर्णय त्यांना सांगा व त्यांचे मत विचारात घ्या .एवढ जरी केलं तर मग ते गेल्यावर श्रध्दा म्हणून पितरांना जेवायला द्या म्हणजे मनात वेगळे विचार येणार नाहीत किंवा त्यांची सेवा न केल्याचा पश्चाताप येणार नाही.बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment