Skip to main content

तुला काय वाटतं

तुला काय वाटतं

अपेक्षा करतो प्रत्येकजण
दुसर्‍या जवळ काहीतरी
पण कधी नाही विचारत
तुलाही वाटतं असेल काहीतरी

आपले मन सर्वांनी जपावे
दुसर्‍याचा कुणी नाही करत विचार
झाले सर्वांचे मन स्वार्थी
नाही विचारत तुलाही असेल विचार

आपलेच म्हणणे करतात खरे
दुसर्‍याला मनच नसते
समोरचा करत राहतो तळमळ
पण त्याच्या तळमळीशी घेणेदेणे नसते

समोरचा असेल कदाचित खरा
हा विचार शिरू द्यावा मनात
अविचाराने एक पाऊल मागे यावे
मग खरी गोष्ट येईल ध्यानात

लोकांच्या तोंडाला नसते कुलूप
बोलत सुटतात न पटणारे
वेळच शिकवते अशावेळी
आपण न बनावे फक्त ऐकणारे

प्रा. दगा देवरे

Comments