Skip to main content

बारावी नंतर काय

ंबारावी नंतर काय
बर्‍याच विद्यार्थ्यांना बारावी नंतर काय करायचे तेच कळत नाही काहींचे ठरलेले असते पण अपेक्षित यश मिळाले नसल्यानेष त्यांचा अपेक्षाभंग होतो व नैराश्य पदरी पडते तेव्हा कुठे जावे व काय करावे तेच कळत नाही अशा वेळी दोन तीन पर्याय ठरवून ठेवावेत असे झाले तर असे करायचे तसे झाले तर तसे करायचे काही मुलांना जे करायचे असते त्याला ते झोकून देतात व यश नक्कीच त्यांना मिळते पण काही कारणास्तव नाही मिळाले अपेक्षेप्रमाणे तेव्हा दोन तीन मार्ग निवडलेले चांगले पण जीवनात कोणताही मार्ग निवडा त्याच्यात तुम्ही best असला पाहिजेत आजही चांगल्या डाॅक्टरांची कमतरता आहे चांगल्या इंजिनिअरची गरज आहे चांगल्या ईलेक्र्टिशियनची गरज आहे .चांगल्या सूताराची गरज आहे चांगल्या शिक्षकाची गरज आहे चांगल्या बाॅसची गरज आहे. आजही चांगल्या हाॅटेलची गरज आहे. भरपूर पगाराची नोकरी मिळाली म्हणजे सार्थक झाले असे नव्हे तर तुम्ही ज्या क्षेत्रांत जाणार त्यात तुम्ही समाधानाने काम करा .पगार घेता पण थोडे जास्त काम मिळाले की मग संताप करता त्यामुळे ते काम best होऊच शकत नाही कोणतेही काम चांगले किंवा वाईट नसते तर तुम्ही त्याला कसा न्याय देता ते महत्वाचे .गल्लोगल्ली भरपूर दुकानं असतात पण आपण विशिष्ट दुकानातच जातो .का? तसेच भरपूर डाॅक्टर असतात पण अमूक एका डाॅक्टरकडेच गर्दि का दिसते शाळेत  काॅलेजमध्ये अनेक शिक्षक असतात पण काही शिक्षकांच्या तासालाच मुले बसतात व तेच शिक्षक त्यांना आवडतात  का? याचे उत्तर तुम्हांलाही माहीत आहे  म्हणून तुम्हाला ज्या क्षेत्रांत जायचे आहे तेथे प्रामाणिकपणे काम करा यश नक्किच मिळेल.आजचा विद्यार्थी गोंधळून गेला आहे कारण सगळीकडे त्याला सारखीच परिस्थिती दिसते अनेक इंजिनिअर 5 -10 हजारावर काम करतात अनेक डाॅक्टरांचे क्लिनिक ओस पडले आहेत अनेक जणांनी शिक्षकाच्या पदव्या घेतल्या पण नोकरी नाही .ओळख नसल्याने नोकरी लागत नाही असे त्यांना वाटते पण तुमच्यात खरेच best असेल तरतुम्हाला कुणीच अडवू शकत नाही म्हणून ह्या सर्व गोष्टींचा विचार करू नका.धंद्याची आवड असेल तर छोट्या पासून सुरवात करा व एक दिवस बरेच लोक तुमच्या हाताखाली काम करतील.योग्य मार्गदर्शन घ्या व रस्ता निवडा आणि मार्गस्थ व्हा कुबड्या फेकून द्या व स्वत:ला सिध्द करा .बघा जमतं का
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...