Skip to main content

दारूडे मुले

आईवडिल व दारूडे मुले

आईला वाटते मला मुलगा झाला त्यामुळे किती खुश असते. त्याला काही कमी पडू नये म्हणून त्याची हौस  पूर्ण करते त्याच्या शिवाय जग तिला नसते .त्याच्या अवतीभोवती ती फिरत असते .सर्व सुखं त्याच्या ओंजळीत टाकते व बापही साथ देत असतो. तो म्हणजे त्यांचे स्वप्न असते पण त्याचे मित्रमंडळी सर्कल मोठे असते . वाईट व्यसन असलेल्या मित्रांच्या नादी  तो लागतो .त्याला दारुचे व्यसन लागते .काही कळायच्या आतच तो नशेत ओढला जातो आईवडिलांना चिंता लागते . मुलाला बर्‍यापैकी नोकरी असते पण दारूचे व्यसन काही केल्या सूटत नाही आईवडिलांना वाटते लग्न केले तर सुधारणा होईल म्हणून चांगली मुलगी बघून लग्न करून देतात .नवे लग्नाचे दिवस गेल्यावर परत तसाच वागू लागतो आता तर त्याला बायको मुले असतात तरीही दारू काही सुटत नाही मग बराच वेळा दारु पिऊन गटरात पडतो तसेच रस्त्यांत पडलेला दिसतो. त्यामुळे बर्‍याच वेळा बापाला कळल्यावर त्याला उचलून घरी आणतो तेव्हा किती यातना होत असतील आईबाबांना.एक दिवशी भरपूर दारू पिऊन येतो व दार बंद करतो . बराच वेळ दार उघडत नाही हे बघून वडिल दार ठोठावतात पण आतून प्रतिसाद नाही मग दार तोडतात तर बघतो कधीच मेलेला असतो .स्वत:च्या खांद्यावर मुलाचे प्रेत नेणे याशिवाय कोणते दु:ख असेल बापाला .अशा मुलांपेक्षा मुले नसलेले बरे .आपला नाश करतात त्याबरोबर पूर्ण कुटूंबाचा नाश होतो .गावात इज्जत जाते तोंड दाखवायला जागा नसते. म्हणून व्यसन नसलेले मुले म्हणजे आईवडिलांची खरी संपती.    ती संपती असणे म्हणजे त्यांचे खरे भाग्य .पोटात दारु तोंडात सिगारेट समोर चिकनचे तुकडे म्हणजेच जीवनातील मजा असे बर्‍याच जणांना वाटते  ही मजा केव्हा सजा होणार हे कळणारही नाही कधी म्हणून गांजा तंबाखू सिगारेट बिडी गुटखा दारू न खाणारे व न पिणारे मुले असणे हे आईबाबांचे परमभाग्य.विचार करा . तुम्ही परमभाग्य आहात का आईबाबांचे ? नसेल तर बनण्याचा प्रयत्न करु या.बघू या जमतं का
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...