Skip to main content

दिसेनासै

दिसेनासे

जे दिसते ते आहे का खरं
थोड्या दिवसांनी होते सारे गायब
मग सारेच असते का खोटे
नाही पचनी पडत ही बाब

चांगली माणसे अचानक
कशी दिसेनाशी झालीत
नुसते बघत राहण्याशिवाय
नसते काही आपल्या हातात

माणूस आहे नियतीचा
हातातला खेळणा
पाहिजे तसा खेळवते
अन् बोलवण्याचा शोधते बहाणा

दिसते ते आहे अस्थिर
कशातच नाही कायमपणा
वर वर दिसते छान
पण आहे सर्व खोटेपणा

आज आहे ते उद्या नाही
कशाचाच नाही भरवसा
माणूस असतो मात्र तोर्‍यात
नाही टाकत तो वाईटचा वसा

माणूस आहे पृथ्वीवरचा पाहूणा
आला आहे काही दिवसांसाठी
कुणीच येत नाही त्याच्या बरोबर
निघतो एकटाच लांब प्रवासासाठी

कुठे गेला हे कुणालाच नसते माहीत
गेला मात्र कुणाला न सांगता
कुठे नेतो मृत्यू त्याला
हे मात्र कुणाला विचारता

काल होता तो आज नाही
भयंकर आहे हे कल्पनेपेक्षा
माणसाचा आहे नाईलाज
अपूर्ण राहते त्याची आकांक्षा

एवढा हुशार माणूस
कसा निपचित पडतो
मृत्यू आहे मोठी शक्ती
माणसाला कायमचा झोपवतो

एकटं जगायला घाबरतो माणूस
पण जाताना जातो एकटाच
घरच्यांवर कोसळते दु:खाची कुर्‍हाड
हतबल होतात मात्र घरचेच

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...