Skip to main content

धरतीचे मनोगत

धरतीचे मनोगत

अरे पाऊसा किती
यायला केला उशीर
डोळे माझे सुजले रे
भेटण्यासाठी झाली होती अधीर

सुकले होते रान माझे
नुसता उरला होता पालापाचोळा
कपाळी माझा होता कुंकू
तुझ्याविना पुसून मात्र गेला

विहिरी नदी नाले आटले होते
नव्हती येत तुला माझी दया
झाली होती माझी दयनीय अवस्था
का  रे आटली होती तुझी माया

रडून रडून अश्रू आटले होते रे
होती बघत तुझी वाट दिवसरात्रं
तू मात्र होता बघत  गंमत
मी मरणासन्न झाली होती मात्र

उन्हाचे चटके होत नव्हते सहन
ताप भरला होता अंगात
नुसती उडत होती धूळ
आठवण येत होती तुझी मनात

आज धावत आलास तू
दिले आलिंगन मला
नाही  मावत गगनात आनंद
कसं सांगू रे मी तुला

होतील रान हिरवे हिरवे
गातील पक्षी मंजुळ गाणी
गायीगुरे होतील आनंदी
मिळेल त्यांना भरपूर चारापाणी

शेतात डोलू लागतील पिकं
शेतकर्‍यांच्या डोळ्यात दिसेल आनंद
मी धरतीमाता होईल तृप्त
फुलांमधून मधमाश्या घेतील मध

नको सोडून जाऊ रे पाऊसा
तुचं माझा रे खरा अलंकार
तुझ्याविना आहे मी अपूर्ण
तुचं माझा सखा अन् जोडीदार

आज शांत झोपेल मी तुझ्या कुशीत
सर्व चिंता दूर करून
विसरून जाईल मी स्वत:ला
तुझ्यात होईल मी विलिन

प्रा. दगाजी देवरे

Comments

  1. खूपच छान, आणि वास्तव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...