Skip to main content

वास्तव

वास्तव

बोलायला आहेत बरेच मित्र
पण एखादाच असतो खरा मित्र

असतात बर्‍याच पदव्या अनेकां जवळ
पण काॅमन सेन्स नसतो मनाजवळ

घर  पाहिजे असते भलेमोठे
पण घरात असतात दोन तीन डोके

शोधली माणसांनी औषधे अनेक प्रकारचे
पण बर्‍याचवेळा रोगावर नियंत्रण नसते कुणाचे

माणसाने ठेवला पाऊल चंद्रावर
पण शेजार्‍यापासून गेला मात्र दूर

भरपूर असतो पैसा घरात
पण शांती नसते कधी मनात

अनेक बुध्दिमान माणसे असतात
वेळ आली तर स्वत:वरचा ताबा सोडतात

मनगटावर असते भारी किंमतीचे घड्याळ
पण कुणाला भेटण्यासाठी काढत नाही वेळ

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...