Skip to main content

शब्द

शब्द
काही शब्दाने माणसे जोडली जातात।
तर एका शब्दाने माणसे तोडली जातात।।

तलवार पेक्षाही शब्द असतात भयंकर।
दिसत नसूनही असते त्यांना चांगली धार।।

शब्दाने माणसे खळखळून हसतात।
तर काही शब्दाने हमसून रडतात।।

संकटकाळी शब्दानेच येतो धीर।
म्हणून शब्दांनाच म्हणतात वीर।।

शब्दांमुळेच ठरते माणसाची हुशारी।
अन शब्दांमुळेच गाठतो यशाची पायरी।।

शब्दांमुळेच वाढतो मित्रपरिवार।
काही शब्दांमुळेच शत्रूंचा होतो वावर।।

काहीजण शब्दांची बनवतात कटकट।
तर काही प्रेमासाठी बनवतात शब्दांना शाॅटकट।।

शब्द हिच असावी माणसाची खरी संपत्ती।
शब्दांमुळे कधीच येवू नये आपत्ती।।

शब्द हाचि देव शब्द हिच लक्ष्मी।
म्हणून त्याला पुजावा तुम्ही आम्ही।।

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...