चालणे
चालणे आहे व्यायामाचा छान प्रकार
जातील त्याने विविध विकार
ज्याने चालणे थांबवले
त्याने रोगांना बोलवले
जो थांबला तो संपला
जो चालला तो तरला
असते नदी पवित्र
चालून होते शुध्द तिचे पात्र
जो चालत नाही त्याचा होतो डबका
शुध्दता संपते त्याची बरका
आळस सोडून चालावे माणसाने
आजारी नाही पडणार रोगाने
चालत असते शरीरातील यंत्रणा
आपण करतो नेहमी बहाणा
वेळ ही असते चालत
नाही ती कुणासाठी थांबत
पृथ्वीही नाही थांबत कुणासाठी
आपण का चालत नाही आपल्यासाठी
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment