Skip to main content

मलाच का

मलाच का
हा प्रश्न बरेच जण विचारतात व त्याचे उत्तर देणे आहे मात्र अवघड काहीच्या जीवनात उलथापालथ होते मग हादरून जातात तेव्हा विचारतात प्रश्न माझ्याच जीवनात का? काहींची प्रकृती धडधाकट असते व अचानक कधी कुणाला हार्टअॅटेक येतो तर कधी कुणाला पॅरालिसिस होतो कधी कुणाचा अपघात होतो तर कधी कुणाला असाध्य रोग होतो कधीही विचार केला नसतो की माझ्या जीवनात असे काही होईल तेव्हा न कळतच ते स्वत:ला प्रश्न विचारतात मलाच का? काहींचा तरूणताठा मुलगा जातो कधी आईवडिलांचे छत्र हरपले जाते कधी बायको सोडून जाते तर कधी घरातील माणसेच विश्वासघात करतात  तेव्हा माणूस पुरता हादरून जातो व याच एका प्रश्नाने  गोंधळून जातो की या जगात एवढे माणसे आहेत मग माझ्याच वाटेला असे जगणे का आले मी तर कुणाचेच वाईट केलेले नाही तरी मग का? काहींची अचानक नोकरी जाते काहींना व्यवसायात प्रचंड नुकसान सोसावे लागते मग एकांतात विचार करू लागतात माझ्याच भाग्यात असे का आले ? याचे उत्तर मिळणे फार अवघड आहे जो तो आपल्या परीने अर्थ काढून त्याला तसे दिवस का आलेतयाकी खमंग चर्चा करतात व आपले मत मांडतात पण शंभर टक्के कुणीच सांगू शकणार नाही की हे झाल्यामुळे हे झाले सर्वच गोष्टी गूढ आहेत .विचार करा व त्यातून बाहेर पडायला जमतं का तेवढेच फक्त बघा
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...