Skip to main content

प्रवेश

प्रवेश

जिकडे तिकडे चालली आहे धावपळ
प्रवेशासाठी करता आहेत पळापळ

दाखले गोळा करत आहेत प्रत्येक जण
नाही आहे त्यांचे भानावर मन

चांगले काॅलेज मिळण्यासाठी करत आहेत धडपड
पण मार्कांची झाली आहे पडझड

डोनेशनसाठी नाही खिशात पैसा
मग कमी मार्कावर प्रवेश मिळेल कसा

ओळखीसाठी पालकांची चालली पायपीट
पण सगळीकडे पैसे व मार्कांची आहे अट

काहींना मिळत आहे प्रवेश सहज
काही मात्र परेशान झाले आहेत आज

बर्‍याच जणांचे मिळाले स्वप्न धुळीला
काहींचे नशीब आहे बलवत्तर बोलायला

प्रवेशासाठी सगळीकडे दिसते आहे गर्दी
वाॅचमन रोखत आहेत  घालून वर्दी

पालक विद्यार्थी फिरता आहेत जोडीने
प्रवेश कसा मिळेल ग्रासले आहे या चिंतेने

काॅलेजमध्ये सगळेच लागले कामाला
वेळ मिळत नाही त्यांना जेवायला

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...