असून नसल्यासारखेच
नोकरी फार चांगली आहे पण तांत्रिक अडचणीमुळे पगार मिळत नाही तेव्हा नोकरी असूनही ती उपयोगाची नाही .माणूस खूप सुंदर आहे दिसायला पण त्याच्या किंवा तिच्या तोंडातून जेव्हा शब्द बाहेर पडतात तेव्हा समोरच्याला दु:ख होऊन रडवल्याशिवाय राहत नाही तेव्हा त्या बाहेरील रूपाचा काहीही उपयोग नसतो .घर खूप छान बांधले आहे पण घरात पाण्याचा व विजेचा गंभिर प्रश्न असतो तेव्हा ते घर काही कामाचे नसते माणूस खूप हूशार असेल पण नम्रता अंगी नसेल तर त्या हुशारीला काही अर्थ नसतो माणसाकडे खूप पैसा असेल पण दान देण्याची इच्छा नसेल तर ते व्यर्थ आहे सर्व मौसम छान वाटतात जेव्हा पाऊसाचा मौसम त्याच्यात समाविष्ट असतो.पैसा संपत्ती सर्व आहे पण मनशांती नसेल व रात्री शांत झोप लागत नसेल तर त्या संपत्ती असण्याला किंमत नाही.सर्वगुणसंपन्न आहे पण चारित्र मलीन असेल तर बाकी गुणांना फारसे महत्व नसते घरात खूप लोक आहेत पण एकमेकांवर विश्वास नसेल तर एकत्र राहण्याला काही अर्थ नसतो.एखाद्याला खूप ज्ञान आहे पण ते दुसर्याना देता येत नसेल तर त्या ज्ञानाच उपयोग नाही .माणसाजवळ खूप विषयांचे ज्ञान असेल पण अध्यामाचे ज्ञान नसेल तर असलेले ज्ञान व्यर्थ आहे माणूस खूप शिकला असेल पण वाईट व्यसने त्याला सुटू शकत नसतील तर शिक्षणाचा उपयोग नाही दात दिसायला खूप सुंदर आहेत पण समोर आलेल्यां ओळखीना साधे smile देता येत नसेल तर त्या दाताचा उपयोग काय .स्वत:मध्ये खूप ताकद आहे पण त्या ताकदीचा उपयोग गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी होत नसेल तर ती ताकद व्यर्थ आहे ज्या पेशात आहात त्यात प्रामाणिकपणाने काम करत नसाल तर त्या पेशात राहून उपयोग नाही.माणूस आहे पण माणूसकी जर नसेल तर माणूस म्हणून जन्म व्यर्थ आहे.
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment