तुला माहीत नाही मी कोण आहे
बर्याच वेळा वरील वाक्य अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते काही भांडण झाले की लगेच तुला माहीत नाही मी कोण आहे असे बोलून मोकळे होतात कारण जो म्हणतो ना वरील वाक्य त्याला स्वत:लाच माहीत नाही की तो कोण आहे व जो समजतो ते मात्र अज्ञानामुळे बोलत असतो की तो कोण आहे .आपण कोण आहोत हे सांगायचाच सर्व शास्रांनी प्रयत्न केला साधुसंतानी याच जन्मी त्याचा अनुभव घेतला त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात देव पाहावयासी गेलो तो देवच होऊन ठेलो तसेच त्यांना कळले की ते कोण आहेत तसेच हे ही कळले त्यांना की समोरचा कोण आहे म्हणूनच तर एकनाथ महाराजांना गाढवामध्ये ते तत्व दिसले त्यामुळे गाढवाला त्यांनी गंगेहून आणलेले पाणी पाजले त्यामुळे त्यांनाच फक्त कळले की ते कोण आहेत व समोरचे कोण आहेत आपण मात्र बोलत असतो की मी असे करीन तसे करीन माझ्या एवढ्या ओळखी आहेत मंत्रालयात ओळखी आहेत पोलीस खात्यात ओळखी आहेत पुढारीं बरोबर उठबस असते म्हणून कळलं का मी कोण आहे असे काहीजण बोलत असतात .मी आॅफिसर आहे मी अमुक आहे तमूक आहे पण ज्यावेळी मृत्यू येईल तेव्हा त्याच क्षणी सर्व संपुष्टांत येते व ज्याच्या जीवावर घमेंड करत होता ते ही त्यावेळी काही करू शकत नाही पण संतानी जे ओळखले ते मृत्यूनंतरही व जीवंतपणीही ते तत्व त्यांच्याबरोबर असते व ते तसा अनुभव घेत असतात व त्यांच्याच मस्तीत असतात कारण त्यांनी पुरेपुर ओळखले आहे की ते कोण आहेत आपण मात्र छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडतो व बाहेर पडत नाही खोट्या प्रशंसा पायी भुलून जातो व खर्याची ओळख आयुष्यभर होत नाही व सारा जन्म दोन तीन घरे काही लाख रुपये काही गाड्या छान शौकीन राहणे यातच निघून जातो व स्वत:ची ओळख मात्र शेवटपर्यंत होत नाही आणि आयुष्य संपून जाते .संत मात्र ओरडून सांगतात की मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू पण त्यांच्या दुकानातून बिन मोलाच्या वस्तू कुणाला नको असतात .असो जय श्रीकृष्ण
प्रा दगाजी देवरे
Comments
Post a Comment