साप आणि त्याच्या तोंडातील बेडूक
सापाच्या कचाट्यात एक दिवशी बेडूक सापडते व साप असा त्याला पकडतो की अर्ध शरीर सापाच्या तोंडात व अर्ध बाहेर म्हणजेच तोंडाकडचा भाग सापाच्या बाहेर असतो मग समोर किटक दिसले की बेडूक ते खातो व अगदी हावरटपणाने खातो पण आपले शरीर सापाच्या तोंडात आहे व त्यापासून सुटका कशी होईल याचा विचार न करता समोर दिसेल ते गिळण्याचा प्रयत्न करतो मग साप त्याचा हावरटपणा बघतो व बेडूकला गिळून टाकतो मग बेडकाचा खेळ तेथेच समाप्त होतो तसेच माणसाचे आहे आपण काळाच्या जबड्यात आहोत व तो कधी गिळेल ते सांगता येत नाही पण तरीही त्या बेडकासारखं किती हावरटपणा करतो देशाला काही लुबाडतात तर काही गद्दारी करतात काही समाजात दंगली घडवतात स्वत:च्या स्वार्थासाठी काही भ्रष्टाचार करून पैशाने आपले घर भरतात काही जण दुसर्यांवर अत्याचार करतात अघोरी आनंद मिळवतात खून बलात्कार दरोडे करण्यात काहीजण तरबेज असतात नोकरी किंवा धंदा करतांना इमानदारी खुंटीला टांगतात पदासाठी कोणत्याही थराला जातात संपत्तीसाठी कोर्टकचेर्या मारामारी खून करायला मागेपुढे बघत नाहीत कारण ते विसरतात की आपले शरीर काळाच्या जबड्यात आहे व तो आपला खेळ कधी संपवेल हे कळणारही नाही तेव्हा जे जे केले ते सर्व व्यर्थच पण काहीजण काळाच्या तावडीतून सुटतात अनेक जणांनी अनेक शोध लावलेत व त्याचा उपयोग आज लोकांना होतआहे व ते अजरामर झालेत काळ त्यांना गाडू शकला नाही अनेक संतही त्याच्या तावडीतुन सुटले व ते अजरामर आहेत सारे कळते सर्वांना पण वळत नाही काहीजण नशेच्या एवढे आहारी गेलेत की त्यातून बाहेर पडणे कठिण.मग काळाला सोपे होते त्यांना संपवायला. नाकळे ते कळे कळे ते नाकळे वळे ते नावळे गुरूविण
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment