धडधाकट शरीर
माणसाचे शरीर धाडधाकट असेल तर त्यात राहते निरोगी मन, बलवान मन .शरीर निरोगी असेल तर मनाला उत्साह निर्माण होतो. रोगी शरीर असेल तर आत्मविश्वास माणूस गमावून बसतो मनही रोगीष्ट बनते आपण आता काहीच करू शकणार नाही असा न्युनगंड निर्माण होतो बरेच जण मानसिक संतुलन बिघडून बसतात शरीर रोगीष्ट असेल तर त्याला काहीच गोष्टी आवडत नाही स्वत:चे जवळचे लोकही आवडत नाही किंवा कुणाबद्दल प्रेम वाटत नाही व तेच धडधाकट शरीर असेल तर स्वप्नाचे इमले रचले जातात आपल्या लोकांसाठी काय करू अन् काय नको असे वाटते गाडी घेऊ बंगला घेऊ जागा घेऊ मुलांना शिकवू सर्वांसाठी काही तरी करायची उर्मी निर्माण होते पण अपंग रोगीष्ट शरीर साथ देत नसल्याने काहीच करावसं वाटत नाही जगणे नकोसे होते एक एक दिवस जगणे अवघड होते पण त्याच शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी काही लोक काहीच करत नाही उलटं त्याला निस्तेज करण्यासाठी विविध व्यसन लावून घेतात व शरीराला रोगीष्ट बनवतात व आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतात खायला मर्यादा नसते प्यायला मर्यादा नसते जागरणला मर्यादा नसते संतापाला मर्यादा नसते बोलण्याला मर्यादा नसते वाईट शब्द बोलण्याला मर्यादा नसते मग सर्वच अति झाले की मग शरीर कमजोर पडते रोगांचे माहेरघर होते व मान सन्मान हरवून बसायला होते आत्मविश्वास संपलेला असतो पण जोपर्यत शरीर चांगले आहे तोपर्यंत त्याची किंमत वाटत नाही व जेव्हा वाटायला लागते तेव्हा वेळ निघून गेलेली असते व पश्चातापा शिवाय आपल्या हातात काहीच नसते म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मनोमार्ग गेला तो येथेचि मुकला हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य .बघा विचार करा व स्वत:कडे लक्ष द्यायला जमतं का बघा
प्रा.दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment