Skip to main content

चिंतन

चिंतन ही एक जीवन जगण्याची कला

माणूस दिवस रात्र कुणाचं ना कुणाचं चिंतन करत असतो त्या चिंतनाचा परिणाम मनावर होतो व मग शरीरावर होतो तुम्ही कोणत्या गोष्टीचे चिंतन करता ते फार महत्वाचे आहे. काही चिंतनाने छान झोप लागते तर काही चिंतनाने झोप उडते .काही चिंतन केल्याने आपला विकास होतो तर काही चिंतनाने जीवन उध्वस्त होते म्हणून चिंतन करून आपणच आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो मग काहीॅ वेळा कुणाशी तरी वाद होतो तो वाद थोड्या वेळाने संपतो पण आपल्या मनात त्या वादाचे चिंतन चालू होते व त्या चिंतनाच्या परिणामाने राग द्वेष मनात निर्माण होतात व ते आपल्याला शांत बसू देत नाही पण जर का त्या वादाचे चिंतन न करता तेथेच सोडून दिला तर मग हे राग द्वेष बदलाची भावना निर्माणच होणार नाही व हे तेथेच सोडून देणे ही मात्र कला आहे व ती आपल्याला जमली पाहिजे शत्रूचे चिंतन जेव्हा करतो तेव्हा निगेटिव लहरी मनात निर्माण होतात व शत्रूंचे नुकसान न होता त्याच्या चिंतनाने मात्र आपले फार मोठे नुकसान होते म्हणून शत्रूंचेही कल्याण होवो अशी भावना ठेवली तर मात्र आपलेच कल्याण प्रथम होईल काहीवेळा कामाच्या ठिकाणी चुका होतात  मग आपल्याला नको त्यांचे नको ते शब्द ऐकावे लागतात त्यावेळी त्या चुकांमधून बोध घेऊन त्या पुन्हा होणार नाहीत याचे चिंतन करून तो विषय मनातून काढून टाकला पाहिजे आपण तो विषय चघळत बसतो व त्रास ओढून घेतो काहीवेळा बसमध्ये रिक्षामध्ये ट्रेनमध्ये वाद होतात असे वाद त्याच मिनिटाला विसरून जायला हवं  नाहीतर आपण वर्षानुवर्ष ते मनात ठेवतो व चिडचिड करत बसतो व स्वत:चे मन प्रदुषित करत असतो .एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तेथील निसर्गमय वातावरण याचे चिंतन करावे कुणाला प्रेमाचे दोन शब्द बोलून कुणाला आनंदी केले असेल तर त्याच्या आनंदाचे चिंतन करावे कुणी आपल्याला संकटसमयी मदत केली असेल तर त्याचे चिंतन करावे आपल्याला सुंदर आयूष्य दिले म्हणून रोज देवाचे चिंतन करावे .ज्या चिंतनाने आपल्या मनात शांती निर्माण होईल व छान झोप लागेल व आपल्यामुळे कुणाची झोप उडणार नसेल तर ते चिंतन चांगले असते व ज्याने आपली झोप उडते व समोरच्याचीही तर त्या चिंतनाला काहीही अर्थ नसतो म्हणून कोणते चिंतन करावे व कोणते करू नये याचेही चिंतन करण्याची ज्याच्याकडे गुरूकिल्ली आहे  तो जीवनात यशस्वी झालाच म्हणून समजा म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांशिल तो ते लावो प्राणिजात.सगळ्याचे कल्याण होवो शत्रूंचे व मित्रांचे तेव्हा आपल्या मनात शांती नांदायला येते व शांती आली की मग तिच्या मागे मागे सर्व तिचे मित्र व मैत्रिणी येतात लक्ष्मी सरस्वती विष्णू हे सर्व राहायला येतात.तेव्हा विचार करू या की सकारात्मक चिंतन करू व स्वत:ला शांतीचा अनुभव प्राप्त करूया .बघूया जमत का
प्रा. दगाजी देवरे
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...