Skip to main content

सातवा आयोग

सातवा वेतन आयोग

आला आला सातवा वेतन आयोग
आता पूर्ण होतील मनातील इच्छांचे योग

मार्गाला लागतील लोकांचे स्वप्न
घेईल उभारी त्यादृष्टीने  त्यांचे मन

चर्चांना आता मिळाला पूर्णविराम
पूर्ण होतील राहिलेले आपले काम

सहजासहजी नाही मिळाला आयोग
संघर्षाचा करावा लागला प्रयोग

आयोगाचा करत होते सारे जप
त्यासाठी करावे लागते खूप तप

किती मिळेल या विचाराने होते पछाडले
केव्हा मिळेल हे मात्र नव्हते कळले

संप  आंदोलन झाले करून
म्हणून आला आज दोन महिन्याचा फरक मिळून

आयोगामुळे अनेक लोकांचे प्रश्न होते रखडले
कसा मिळेल याकडे होते डोळे लागले

सगळीकडे आहे  तेच बोलणे
बाकीचे विषय  आता न आवडणे

आज सगळे  झाले पगारानेे लखोपती
शिक्षक झालोत याचा अभिमान वाटती

संदिप सरांच्या मेसेजने फुलला चेहर्‍यावर आनंद
हाच आपला खरा परमानंद

आज सगळे दिसत होते  खूप आनंदी
बोलताना जाणवत होते मला पदोपदी

सुजाता मॅडमच्या चाॅकलेट होत्या आज भारी
पगार बघून घेतली होती मनात सगळ्यांनी उंच भरारी

तीस तारखेला पार्टीला करू मजा
विसरून जाऊ आजवर जीवनात मिळालेली सजा

जे परमनंट नाहीत त्यांचीही पूर्ण होवो लवकरच इच्छा
अशी करतो परमेश्वराकडे मी अपेक्षा

शारदूल मॅडमचे मानू या सगळ्यांनी आभार
त्यांचेही कष्ट होते यात फार

ऐकली सरकारने आपली  प्रार्थना
पूर्ण झाली आपली मनोकामना

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...