Skip to main content

अती घाई संकटात नेई

अति घाई संकटात नेई

घाई नको कामाची
ठेवा डोकं शांत
घाईत येते संकट
विचार न करता धावत

होतात चुका फार
काम करताना घाई
माणूस येतो अडचणीत
म्हणून  नको कशाला घाई

गाडी चालवताना घाई घाईत
जायचे असते कामाला
होतो तेव्हा अपघात
म्हणून जागा नको पश्चातापाला

घाई घाईत चुकतात
जीवनातील महत्वाचे निर्णय
योग्य विचार करून
शोधावा चांगला पर्याय

काही निर्णय घ्यावे लागतात
जीवनात फक्त एकदाच
शांत डोकं ठेऊन
शंभर वेळा विचार करावाच

घर गाडी लग्न संपती
यासाठी करावा शांत डोक्पाने विचार
चुकला आपला निर्णय तेव्हा
संकटाचे लांब नसते अंतर

घाई घाईत नको
शब्द देऊ कुणाला
पुढे मात्र बिघडतात संबंध
जर शब्द नाही पाळला

ट्रेन बस मध्ये नको
घाई  चढण्या उतरण्याची
काहीवेळा जीवावर बेतते
याची जाणीव असावी कायमची

नवीन मैत्रीमध्ये नसावी
घाई विश्वासाची
तोलून मापून करून
नको शंका संशयाची

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...