Skip to main content

पार्टी

पार्टी

चला चला पार्टीला जाऊ या
आज सारे एकत्र जेवायला बसू या

छान छान गप्पा गोष्टी करू या
पार्टीला आज मात्र जाऊ या

पार्टीला ताक आमरस पिऊ या
आईसक्रीमवर ताव मारू या

मसालेभात भजी खाऊ या
सलॅड पापड लोणचे घेऊ या

फ्लाॅवर मटार पनीरची भाजी खाऊ या
गप्पा मारत जेवण आज करू या

एकत्रित जेवणाचा आस्वाद घेऊ या
हा दिवस लक्षात कायम ठेवू या

कामाचे टेंशन  आज बाजूला ठेवू या
पार्टीत खळखळून आज हसू या

छान छान फोटो आज पार्टीत काढू या
म्हणून नटून थटून आज येवू या

आज कटूता सारे विसरू या
एकमेकांशी हसून मन साफ करू या

जे नाही आले पार्टीला त्यांना समजुन घेऊ या
पुढच्या वर्षी नक्की येतील अशी आशा ठेवू या

रूकमती जिंदाबादचा नारा देऊ या
असचं सहकार्य नेहमी ठेवू या

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...