मंदिरातले दान व गोरगरिबांना दिलेले दान
आज जर आपण बघितले तर असे दिसून येईल की मंदिरामध्ये दान देतांना माणूस कंजूषि करत नाही .मंदिराच्या पेटीत एक रूपया दहा रूपये टाकायला त्याला लाज वाटते मग शंभर पाचशे हजार तसेच सोने चांदी लाखो रूपये मंदिराच्या पेटीत टाकतात पण गरिबांना दान देतांना दहा रूपयेही फार मोठे वाटतात मग रूपया टाकतात नाहीतर म्हणतात आगे जाओ .ज्याला खरंच गरज आहे त्याला मिळत नाही व जेथे एवढ्या पैशांची गरज नाही तेथे अमाप पैसे जमा होतात .दान मंदिरात टाकले तर हा गैरसमज आहे की त्या दानाने आपल्याला पुण्य मिळेल व आशिर्वाद मिळेल देवाचा .पण गरीबांना दिलेले दान कधिच वाया जाणार नाही त्यांच्या मुखातून निघालेले आशिर्वाद नक्कीच आपले भले करणार व खरे पुण्य मिळेल. श्रीमंत लोक आपली श्रीमंती मिरवण्यासाठी मंदिरांना लाखो रुपये दान देतात व फोटो काढून प्रसिद्धी मिळवतात पण अशाने कवडीचाही आशिर्वाद मिळणार नाही .गोरगरीब लोकांच्या चेहर्यावर दानाने आलेला आनंद कैकपटीने पुण्य प्रदान करतो.म्हणून विचार करावा दान देतांना .देवाच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत उभे राहण्याऐवजी गरीब दीन दुबळे यांच्या सेवेसाठी रांगेत उभे राहावे .देव हा सगळिकडे आहे गोरगरीबांच्या वस्तित तो कायम असतो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि संत ओळखावा देव तेथेचिं जाणावा .सत्य हे वेगळे असते व ते जाणण्याचा प्रयत्न केला तर नक्की दिशा मिळते .म्हणून सांगतो मंदिराच्या दान पेटीत टाकण्याऐवजी अनाथालय वृद्धाश्रम गरीबांची वस्ती गरजूंना मदत अशा ठिकाणी दान केल्याने मोठे पुण्य मिळते .बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment