लपलेले गाव
केला होता मनाचा निश्चय
काढू ट्रिप दूर कुठेतरी
विचारविनिमय केला मित्रांशी
त्यांच्या पाठिंब्याची मिळाली खात्री
हिडन विलेज ठरली
ट्रिपसाठी अप्रतिम जागा
मग एक एक जमा झाले
आलेल्यांनी नाही केला त्रागा
23 डिसेंबर उजाडला दिवस
आनंदाची होती ती पहाट
बसमध्ये बसले सगळेजण
तेव्हा आनंदाचे भरले जसे ताट
गाण्यांची चालू झाली मैफिल
एक से एक केले पेश
आनंदाच्या लहरी आल्या
कधी आले हिडन नाही कळले कुणास
खाण्याला होती एक छान चव
खाऊन झाले सगळे तृप्त
तेथील वातावरण बघून
सगळ्यांना झाला आनंद प्राप्त
खो खो हाॅलिबाॅल खेळण्यात
आली सगळ्यांना मजा
डाॅस बाॅल खेळाने काही पडले
पण नाही झाली कुणाला सजा
क्रिकेटही मनसोक्त खेळलो
चौकार छटकार मित्र होते मारत
बॅटमिंटन खेळूनही वाटले भारी
काहीजण कॅरमही होते खेळत
टेबल टेनिस खेळले काहीजण
विसरले होते नाव गाव
माशांच्या डोहात सोडून पाय
एक आगळाच मिळत होता अनुभव
बोनसे मॅडमचा लग्नाचा
केला वाढदिवस साजरा
त्यांना शुभेच्छा देऊन
संध्यान सरांनी केला गाण्याने त्यांना मुजरा
शेवटी रंगली गाण्यांची
एक मैफिल छान
सैराटच्या गाण्यावर मजा
आली डान्स करून
केला मग परतीचा प्रवास
वाटून फळे आणि चाॅकलेट
आभार प्रदर्शन करून
घेतली सगळ्यांनी परतीची भेट
प्रा, दगाजी देवरे
Comments
Post a Comment