Skip to main content

जादू

जादू
सकाळी उठल्या उठल्या काय खायला पाहिजे याचे चिंतन सुरू व्हायचे मग सकाळी दोन तीन चपाती भाजी बरोबर दुधाचा चहा हे सातच्या आधीच पोटात जायचे मग दहा वाजता नियमित नाष्टा व्हायचा मग स्टेशनवर वडापाव काॅलेजला पोहचल्यावर चहा वडा व्हायचा एक वाजता जेवण  मग तीन वाजता परत चहा चार वाजता काहीतरी कॅन्टिनमधून खायचे घरी सहा वाजता आल्यावर परत चहाबरोबर काहीतरी खाणे व्हायचे व रात्री जेवण असा भरगच्च प्रोग्राम होता खाण्याचा .एवढे खाऊनही मनाला शांती नव्हती अवजड डोके व्हायचे शरीराच्या तक्रारी चालू होत्या मग
एक दिवस उजाडला काहीतरी जादू घेऊन  श्री जगन्नाथ दिक्षित सरांचा व्हिडिओ बघायला मिळाला व जीवन एकदम बदलून गेले दिनक्रम सुरू झाला सकाळी कोमटपाणी व लिंबू  walking सुरू झाले जे खायचे ते फक्त दोन वेळा खायचे. सुरवातीला अवघड गेले पण हळूहळू सवय व्हायला लागली व वजन हळूहळू कमी व्हायला सुरू झाले 25 दिवसात सात किलो वजन कमी झाले इतक्या वर्षी साचलेले वजन कमी झाले एकदम हलकं वाटू लागले शरीरात उत्साह संचारला थकव्याने कायमची रजा घेतली गुडघेदुखी नाहीशी झाली  मनशांती मिळू लागली पुर्नजन्म झाला की काय असे वाटू लागले  स्वत: हे आपण करू शकू हा प्रयोग असा विश्वास वाटत नव्हता  ते शक्य झाले होते खाण्यावरचे मनाचे नियंत्रण  आले खाण्यासाठी जे भरकटायचे ते फक्त दोन वेळाच वाट बघते त्यामुळे वाट बघण्यासाठी जी उर्जा खर्च व्हायची ती वाचली  व साचलेले वजनाचा बोझा कमी झाला  ही जादू मी स्वत: अनुभवतो आहे व इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे  .दिक्षित सर  जय हो
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...