बचत आणि बचत
माणसाला मिळणार्या पैशांतून बचत ही तर केली पाहिजे वायफळ खर्च करण्यापेक्षा बचत केल्याने येणार्या अडचणीत तो पैसा कामाला येतो पण बचतीचेही प्रमाण असावे नाहीतर फक्त बचत करत राहणार व दैनंदिन आयुष्यात जे आपल्याला पाहिजे त्यासाठी मन मारत बसणार पैसा राहूनही बचतच्या मागे लागून ना गाडी ना चैनीच्या वस्तू घरात कोणत्या नवीन वस्तू नाहीत घराला रंगरंगोटी नाही सणावाराला नवीन कपडे नाहीत सुट्या असतील तरी फिरायला जायला नको कारण बचतीमुळे पैसा हाती नाही ऐन उमेदीत ज्या इच्छा असतात त्याकडे दुर्लक्ष करायचे .म्हातारपणात बचतीचा पैसा कामाला येईल म्हणून तरूणपणात फक्त बचत करत राहायचे का? जरूर बचत हवी पण तरूणपणात कोणत्या इच्छांना फाटा न देता आणि काय भरवसा म्हातारपणापर्यंत आयुष्य असेलच .म्हातारपणी सर्व अवयव शितील होतात .हे दुखते ते दुखते शरीर साथ देत नाही मग कुठे व कसे फिरायला जाणार तसेच उतारवयात काहींचे जोडीदार देवाघरी गेलेले असतात मग त्या बचतीच्या पैशांचे काय करणार याचा विचार करून किती बचत करावी याचे गणित असायला हवे .मुलांना काय काय हौशीच्या गोष्टी करायच्या असतात पण बचतीमुळे त्यांची हौसमौज पुरवता येत नाही तसेच स्वत:ही मन मारून इच्छा मारून पैसा खर्च करायचा नसतो फक्त बॅंकेत पडून राहिलेल्या पैशांकडे बघत बसायचे .गरजवंताला द्यायला पैसे नसतात .शेवटी मुलांनाही वाटते एवढे करोड आपल्या बापाकडे आहेत मग त्या पैशांवरुन भानगडी होतात मुलींना वाटते माझाही हिस्सा आहे व त्या हिस्सावरुन घरात फूट पडते मग पश्चाताप येतो की बचत केलेला पैसा असा कामी आला म्हणून .बचत करू नका असे मला म्हणायचे नाही बचत करा पण तारूण्यात पैशांचा जास्तीत जास्त उपभोग घेतला गेला पाहिजे व घरातील सदस्यांना असे वाटायला नको की लहानपणी पैसा राहूनही पैसा नव्हता व कोणती मजा करता आली नाही .शेवटी उद्या मी असे करेन तसे करेन हे खोटं कारण आयुष्य आपल्या हाती नाही पण आजचा क्षण आपल्या हातात आहे व त्याचा पुरेपूर उपभोग घेतला पाहिजे .उतारवयात तरूनपणी उपभोगलेले आनंदाचे क्षण नवीन उर्जा देत असतात जगायला .बघा पटतं का व असे जगायला जमेल का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment