Skip to main content

मी कात टाकली

मी कात टाकली
आयुष्याचा विचार केला की लक्षात येईल की
आयुष्य माणसाचे एकदम रूटीन होऊन जाते सकाळी उठायचे कामाला जायचे व संध्याकाळी  घरी यायचे गप्पा मारायच्या टी व्ही बघायची जेवण करायचे व झोपून जायचे दुसर्‍या दिवशी परत तसेच रूटीन असे वर्षानुवर्ष चालते कोणताही बदल होत नाही तेच वजन त्याच शरीराच्या तक्रारी सुरू असतात .कंटाळवाणे जीवन वाटू लागते दहा वर्षापूर्वी जसे दिसत होतो त्यापेक्षा आता बेढब दिसायला लागतो वय वाढल्याची जाणीव होते पण अचानक कुणीतरी जे आपल्या ओळखीचे नसतात त्यांना यापूर्वी कधी बघितलेले नसते ते आपल्या जीवनात काय येतात व आपले जीवन लक्षणिय बदलून टाकतात त्यामुळे जगण्याला परत हूरूप येतो तसेच माझ्या आयुष्यात झाले  डाॅं दिक्षित सरांचे व्याख्यान एके दिवशी ऐकायला मिळाले व त्याचा परिणाम असा झाला की जे माझे जवळचे लोक माझ्यात बदल घडवू शकले नाहीत ते सरांच्या व्याख्यानामुळे झाला  वजन कमी करायची गुरूकिल्ली सरांकडून मिळाली व त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी मी केली व त्याचा परिणाम एवढा छान झाला की मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही जे शक्य नव्हते ते शक्य झाले होते  आज वजन आहे 63 किलो. 72  वरून आज 63 झाले  . सुरवातीला पटकन कमी झाले मग आता हळूहळू होत आहे . एक एप्रिलला चालू केले होते . जशी काय मी जुनी कात टाकून दिली व नवीन चमकणारी कात निर्माण झाली वजन कमी झाल्यामुळे व जीवनात काय खावं किती खावं केव्हा खावं किती वेळा खावं ही नवीन दृष्टी निर्माण झाली त्यामुळे खातांना खूप आनंद वाटतो याआधी फक्त पोट भरणे हाच उद्देश होता व कधीही केव्हाही किती वेळाही खात सुटायचो आता सरांमुळे जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आता असे वाटते की आज जो मी आहे तो मी तीन चार महिण्याचापूर्वीचा नव्हतोच किती बेशिस्तपणाने शरीराचे लाड पुरवले होते व त्याच्यावर खाण्यासाठी किती अत्याचार केले होते हे बघून आता खूप वाईट वाटते आज एकदम तरूण झाल्यासारखे वाटते चालावसे वाटते खूप धावावे असे वाटते काम करताना कोणताही थकवा जाणवत नाही कायम उत्साह वाटतो जे 25 वर्षाचा असताना वाटायचे ते आज वाटते एवढा बदल बघून माझाच माझ्यावर विश्वास नाही सरांच्या diet च्या जोडीला प्राणायाम व योगा यांची जोड दिल्यामुळे अजूनच परिणाम जाणवतो या गोष्टी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात किती महत्वाच्या आहेत नाहीतर तरूण लोकांना सुध्दा हार्टअॅटेक येतो व सोडून जातात मग कमवलेला पैसा व्यर्थच म्हणून पैशांच्या मागे जास्त न धावता आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे जीवनाला आवश्यक असलेला पैसा कमवलाच पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या शरीराकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे असा तारूण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सरांचे diet तसेच योगा प्राणायाम सातत्याने करा व त्वरीत लक्षणीय बदल तुमच्यात कसा होतो ते प्रत्यक्ष अनुभवा .जे अनुभवले ते सांगितले बघा विचार करा व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...