आम्ही मठ्ठ
मठ्ठ मठ्ठ असे आम्हांला
कुणी काहीही बोलतं
स्वत:ला नसलेली अक्कल
मात्र गहाण टाकतं
खूप वर्षापासून करतो
आम्ही इमानदारपणे काम
आमची सर नाही कुणाला
आमची बरोबरी करण्यात नाही तुझ्यात दम
आमच्या सावलीला उभी
राहायची नाही लायकी
स्वत:त शिल्लक नसलेली
शिकवतात मात्र आम्हाला माणूसकी
स्वत: चुका करून करून
एवढी वर्ष घातली
तुला सांगून सांगुन
सुधारणा नाही मात्र झाली
कसे बोलायचे हे कायम
आमच्याकडे बघून शिकला
पण नम्रपणा मागे ठेवून
शेवटी माठच मात्र राहिला
.यांना येत नाही काही
असे बरळत आहे
लोकांची दिशाभूल करून
स्वत;छी पाठ थोपटत आहे
ज्याला बसायच नाही माहीत
नाही माहीत काय खावं
तो आम्हांला शिकवतो अक्कल
यालाच मठ्ठ म्हणावं
ना रूप ना काही गंध
समजतो स्वत:ला हुशार
नको ती दाखवतो हुशारी
,आमची कधीच येणार नाही तुला सर
आंधळ्याला सारे जग
दिसते फक्त आंधळं
ज्पाला नाही दिसत चांगल
त्याचचं मन असते काळं
चोराच्या असतात उलट्या
फक्त बोंबा
शांती नसते त्याच्या मनाला
करत असतो तोबा तोबा
आहे एक नंबरचा माठ
समजतो स्वत:ला वेगळा
पण वरचा मजला आहे खाली
माठपेक्षा नाही तू निराळा
आम्ही आहोत आकाशात
उंच भरारी घेणारे गरूड
कावळ्याला नाही कळणार
आम्ही घालतो आमच्या मनाला मुरड
आम्ही आहोत शांत
त्याची पाहू नये परिक्षा
नाहीतर दाखवून देऊ जागा
मग पळण्यासाठी शोधत बसणार रिक्षा
एक माठ
Comments
Post a Comment