असावा जन्म
जन्म असावा कुत्र्याचाही
आलिशान कारमध्ये फिरण्यासाठी
मऊ मऊ गादीवर लोळून
छान छान खाण्यासाठी
पक्षाचा जन्म असावा
सुंदर सुंदर रानात
इकडून तिकडे उडावे
फळे व फुलांचा आस्वाद घेत
घोड्याचाही जन्म चालेल
पण शिवराय माझ्यावर स्वार व्हावे
त्यांचे पराक्रम बघून
जीवन सफल होऊन जावे
बैलाचाही जन्म आवडेल
पण माझ्यावर असावे प्रेम
मला मुलासारखे वागवावे
मग मी ही करेल न थकता काम
असावाा जन्म माणसाचा
मिळावी त्याला रोजची भाकरी
प्रामाणिकपणे काम करण्यासाठी
असावी मला छान नोकरी
जन्म असावा एखाद्या
दगडाच्या छान रूपात
त्याची व्हावी देवाची मृती
पुजिला जावा तो सगळ्यांचा मनात
प्रा.दगाजी देवरे
Comments
Post a Comment