problem मोठा की आपण
प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे येतात .त्या संकटात काही तरून जातात व संकटांवर मात करतात तर काही संकटे माणसावर मात करतात व माणसाला नष्ट करतात परंतु संकटे लहान की मोठे हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असतात काही लहान असतात संकटे पण माणूस त्याला मोठे बनवतो व काही मोठे असतात पण माणूस त्यांना लहान समजतो एकाच प्रकारची संकटे काहींना मोठी वाटतात तर काहींना छोटी वाटतात काही त्यांना हरवतात तर काही माणसे संकटापुढे हार मानतात .छोट्या छोट्या संकटांना फार मोठे करतात व त्यांच्यापुढे स्वत:ला खुजे करतात व जीवनाची लढाई हारतात मग परिक्षेचा निकाल असो की घरातले भांडण असो किंवा कुणाचा आलेला राग असो किंवा रस्त्याने चालतांना तसेच गाडीत प्रवास करताना साधी धक्काबुक्की झालेली वा रिक्षाचालकाबरोबर सुट्या पैशाचा वाद असो असे अनेक दिसायला छोटे प्रसंग असतात पण आपल्या इगोमुळे आपण त्यांना मोठे करतो व छोट्याचे रुपांतर पोलीस स्टेशन हाणामारी काही वेळा खून मग तुरूंगवास असे परिणाम दिसून येतात पण काही माणसे अशा प्रसंगाना शुल्लक समजतात व कानाडोळा करतात प्रसंगी माघारही घेतात व परिणांमापासून वाचतात व अशा छोट्या गोष्टींमुळे उगीचच जीवनात टेंशन निर्माण करून शांततेचे जीवन अस्ताव्यस्त होऊन जाते .काहीवेळा संकटे मोठी असतात उदा जमीनजुमलाचा वाद संपत्तीचा वाद भाउबंदकीचे वाद नवराबायकोचे कोर्टात गेलेले प्रकरण असले संकटामुळे माणूस हादरून जातो व स्वत:चे जीवन व दुसर्याचे जीवन बरबाद होऊन जाते पण काही माणसे अशा मोठ्या संकटांनाही छोटे समजतात व मार्ग काढतात ज्यावेळी कोणत्याही संकटांना माणूस आपल्यापेक्षा मोठे समजत नाही त्यावेळी संकटांवर मात करणे फार सोपे होते व माणूस त्यातून तरून निघतात शेवटी आपण मोठे असतो संकटे आज आहेत ते उद्या नसणार पण आपले जीवन शेवटी अनमोल असते त्यामुळे संकटावर मात करायची असेल तर त्यांना आपल्यापेक्षा कधीही मोठे समजू नये .तसे करणे अवघड असते पण प्रयत्न केल्याने अशक्य मात्र नसते बघूया या जमतं का
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment