Skip to main content

नियामक

नियामक

नियामक झालात म्हणून
देतो तुम्हांला शुभेच्छा
छान काम होईल तुमच्याकडून
अशी करतो मनापासून इच्छा

विद्यार्थ्यांना मिळेल न्याय
नाही कोणती  आता शंका
बरेच शिक्षक करतात
मार्काच्या बाबतीत विद्यार्थ्यांवर अन्याय

पडेल प्रभाव  परिक्षकांवर
तुमचा नियामक म्हणून
तपासतील पेपर व्यवस्थित
तुम्ही चुका काढू नये म्हणून

कसे करावे पेपर याचा घ्यावा
सल्ला जुन्या नियमकांकडून
छोट्या छोट्या गोष्टी शिकावे
चांगल्या त्यांच्याकडून

होईल त्रास पहिल्यांदा
नियामक म्हणून काम करताना
नंतर मात्र सुसाट सुटेल गाडी
कोणताही ब्रेक न दाबतांना

परिक्षकांनी पेपर दिले किती
याचा हिशोब ठेवावा चोख
छोटीशी चूक पडते महागात
उगीचच होतो डोक्याला खुराक

नियामक म्हणून पाडावी
परिक्षकांवर चांगली छाप
कुणाशीच होऊ नये वाद
नाहीतर होतो मनस्ताप

गोड बोलून करून घ्यावे
त्यांच्याकडून चांगले काम
चहापाणी देऊन काहीवेळा
खर्च करावा त्यांच्यासाठी दाम

वेळेवर द्यावे पेपर बोर्डात
कोणताही आळस न करता
आपले नाव होऊ नये खराब
याची काळजी घ्यावी मात्र आता

एक तारीख निश्चित करून
त्यादृष्टीने करावे उत्तम नियोजन
स्वत:लाच होतो  तेव्हा आनंद
काम झालेले वेळेत करून

नियामक देवरे सर
रूपारेल काॅलेज
गणित विभाग
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...