मला पडलेला प्रश्न
इंजिनिअर बनावसं वाटतं
तर कधी डाॅक्टर
सगळेच आहे कठिण
कारण पैसा आहे मोठा फॅक्टर
कधी शिक्षक व्हावसं वाटतं
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी
आजकाल विद्यार्थी हा बदलला
कधीही न बदलण्यासाठी
वाटते कधी करावी कंपनीत
एखादी छोटीमोठी नोकरी
पण पगाराकडे पाहून
मिळत नाही लग्नासाठी छोकरी
कधी वाटते मी बनावे
शेतकरी एक चांगला
पण हमीभाव मिळत नाही
शेतकर्याच्या मालाला
कधी वाटते मारावी
आकाशात गरूड भरारी
पण पंखात नाही बळ
म्हणून मन नाही घेत उभारी
कधी वाटते सोडून सारे
जावे हिमालयात म्हणून संन्यासी
पण नाही राहता येत
मला मात्र कधी उपाशी
कोणते शिक्षण घ्यावे
याचाच पडला प्रश्न मला
सगळीकडे आहे बेरोजगारी
शिक्षणाचा फायदा होईल का स्वत:ला
कोणती वाट निवडावी
हेच काही कळतं नाही
सांगणारेही आहेत गोंधळात
बिचारे स्पष्ट काही बोलतचं नाही
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment