योगाचे महत्व
झाली आहे सगळीकडे
आरोग्याची चांगलीच माती
तारणारा आहे आपल्याजवळ
योगामध्ये करावी गती
जीवन झाले आहे धकाधकीचे
त्यामुळे स्वास्थ पूर्ण बिघडले
करा सकाळ संध्याकाळ योगा
स्वास्थ होईल चांगले आपुले
वाढले ह्रदयाचे गंभीर प्रश्न
बरेच जण मुकले प्राणास
द्या ह्रदयाला योग्य व्यायाम
सुख अन् शांती मिळेल आपणास
ठेवा आहारावर नियंत्रण
नका साठवू अतिरिक्त चरबी
घात करेल ती तुमचा
ध्यानात घ्या आरोग्याच्या बाबी
योगाला करा तुमच्या
जीवनाचा मुख्य आधार
रोज करा नित्यनियमाने
आजार जातील पळून दूर
योगाने वाढेल आयुष्य तुमचे
सुखशांती नांदेल मनात
नको डाॅक्टरांची आठवण
लक्ष्मी पाणी भरेल घरात
आलोम विलोम करून
करा रोज कपालभारती
योगासने घ्या शिकून
मनात नांदेल शांती
योगाने वाटेल कायम तरूण
थकवा जाईल कायमचा दूर
कामात लागेल मन
उत्साह वाटेल भरपूर
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment