माझ्याच घरी दुर्गा
माझीच आई एक दुर्गा आहे कारण माझी आजी सांगायची की आई जेव्हा दहा बारा दिवसांची होती तेव्हा मांजर तिला आपल्या दातात घेऊन कोपर्याला घेऊन गेली पण लगेच कुणाचं तरी लक्ष गेले व तेथून आईची सुटका झाली त्यादिवसापासून आजपर्यंत तिच्या जीवनात फक्त कष्ट लिहिलैली आहेत व त्यांना ती धाडसाने सामोरी गेली .माहेरी पण ती शेतीची कामे चांगली करते म्हणून शाळैत जाऊ दिले नाही त्यामुळे माहेरीही शेतीची कामं करत राहिली मग लग्नानंतर भरपूर मोठं कुटूंब असल्याने येथे कष्टच लिहिलेली होती कुणी चांगले बोलेल ही सुध्दा अपेक्षा नव्हती लग्नानंतर आजार जडलेत तीन वर्ष आजारात काढली पण आजारांना खंबीरपणे तोंड दिले मग आम्ही चार भावंड झालोत .आम्हांला काही कमी पडणार नाही म्हणून काळ्या मातीशी लढत राहिली स्वत: शिक्षित नसली तरी शिक्षणाचे तिला महत्व होते व सर्वांनी शिकावे व नोकरी करावी माझ्यासारखे शेतीत कष्ट करू नये असेच तिला वाटत होते विहिर जेव्हा शेतात केली तेव्हा स्वत: विहिरीतली माती उपसण्यासाठी शिकाळि धरली शिकाळि म्हणजे माती भरतात ती टोपली ..शेतीचे काम करताना बैल स्वत: हाकायची कधी नांगरणीच्या वेळी कधी विहिरीची माती काढतांना जेव्हा शेतात माल यायचा तेव्हा रात्रंभर शेतात कणसांवर झोपायची ते सांभाळण्यासाठी .रात्री आम्हांला भिती वाटायची पण तिला भिती गोष्टच माहीत नाही गायी म्हशिंचे दूध काढण्यासाठी सकाळी चार वाजताच शेतात जायची .गहू कापणी बाजरी कापणे निंदणी उस लावणे बैलांना चारापाणी करणे बकर्याचा जोडधंदा करणे म्हणजे वडिल तिला मदत करायचे पण ती संसाराचे पूर्ण ओझं पेलायची .शिक्षित नसूनही आई मात्र सुसंस्कृत नक्किच होती .शिक्षणाचे महत्व जाणूनच तिने आम्हा सर्वांना शिकवले स्वत: एकच लुगडं वर्षभर वापरले पण आम्हांला शिकवले उपास वेळि कधीली तिनै खाल्ले नाही पै पै जोडायची व शिक्षणावर खर्च करायची .एकदा शेतात काम करत असताना एक सर्प साडीच्या खाली लपला मग क्षणाचाही विलंब न करता त्याची मानगुटी अशी पकडली तिने की त्याला हालचालच करु दिली नाही कधी विंचू चावला कधी गांधील माशी चावल्या कधी गायीने लाथ मारली तर कधी बैलाने शिंगे खूपसली कधी विजेचा शाॅक लागला तर कधी निंदतांना व पिके कापतांना विळ्याने रक्त वाहिले तर कधी मक्याचे धसकट पायात घूसून रक्तबंबाळ झाली कधी डोळ्यांचा आजार झाला तर कधी भाऊबंदकीचे भांडणे कधी वडिल विरूद्ध पक्षांची भूमिका बजवायचे तर कधी शेताच्या शेजारील लोकं त्रास द्यायचे बांध फोडण्यावरुन .भर उन्हात पावसाळ्यात हिवाळ्यात शेतीचे कामं करताना हाडं झिजवली व त्या काळ्या मातीत सोनं पिकवून दाखवलं हे सारे करत असतांना भजन किर्तनाची प्रचंड आवड तसेच तिर्थयात्रा करून पूर्ण भारत भ्रमण करून आली अशा रीतीने संसाराचा गाडा हाकत असतांना अचानक माझे वडिल कॅन्सरने गेलेत तेव्हा तिचा आधारच देवाने काढून घेतला पण आमच्यासाठी ते दु:ख बाजूला ठेवून ती पुन्हा उभी राहिली व काळ्या मातीशी अशी लढली की आम्हां सर्वांना तिने आधार दिला व आमचे शिक्षण व लग्न केले .घरी कुणीही आले की अतिथी देवो भव: या न्यायाने कधी विन्मूख पाठवले नाही कधी जेवण तर कधी ताक दही दूध द्यायची.गरजू लोकांना मदत करायची .आजही करते आहे .का रे ला नारे उत्तर द्यायची हिंमत ठेवायची .तसेच गोड बोलून कामं करून घेणे ही हातोटी आहे . शिक्षण नसूनही अभंग पाठ आहेत .हिशोबाला एखाद्या गणित तज्ञानाला मागे पाडील .तिला जे जमलं ते मला कधीही जमणार नाही तिच्यासारखे बनणे या जन्मात मला कधीही शक्य नाही .तिच्यापोटी जन्म म्हणजे मी स्वत:ला भाग्यवान समजतो आज आम्ही सर्व भावंड सुखाचे घास खातो ते सर्व तिच्या घामामुळेच .आजही तिला बसणे आवडत नाही. सत्तर वय आहे परंतु एखाद्या पुरूषाला लाजवेल असे शेतात पिकं उभी करते व आमच्याकडे बघून समाधान वाटते तिला व तिला आम्हीही काहीही कमी पडू देत नाहीत .तिने दिलेले संस्कार हे मात्र आमच्या यशाला कारणीभूत आहेत अशी दुर्गा आमच्याच घरात आहे .तिला त्रिवार नमस्कार व तिच्या कृपेनेच जीवन छान चालू आहे .अशीच कृपा बरसो व निरोगी आयूष्य भरपूर लाभो तिला अशी देवाकडे प्रार्थना करतो
प्रा. दगाजी देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
मुळ गाव निताणे सटाणा
7738601925
Comments
Post a Comment