ओझे
बरेच जण बोलतांना दिसतात की मला हे ओझे आहे ते ओझे आहे पण ओझे म्हणजे नेमके काय असते जैथे आपलेपणा नसतो त्याला ओझे म्हणतात .एक वयस्कर महिला आपल्या अपंग मुलाला पाठीवर घेऊन देवीच्या पायर्या चढत असते तेव्हा एक व्यक्ती तिला बोलला अग आजी एवढे ओझे घेऊन तू पायर्या चढणार ती लगेच उत्तरली ओझे? तो तर माझा मुलगा आहे तो ओझे नाही म्हणून जेथे आपलेपणा असतो ते ओझे नसते त्याच्या प्रेमापायी ते ओझे वाटत नाही जेथे स्वार्थीपणा घुसतो परक्याची भावना निर्माण होते तेव्हा ते ओझे वाटायला लागते एखादा पाहूणा आपल्याला बोझ वाटायला लागतो कधी जाईल असे वाटते पण काही पाहूणे कधीच जाऊ नयेत असे वाटायला लागते कारण त्यांच्याविषयी आपूलकी असल्यानेच त्यांचे ओझे वाटत नाही जेथे प्रेमाची भावना असते ते ओझे नसते म्हणून एखाद्या कामाबद्दल दोन व्यक्तींमध्ये विभिन्न मते असतात एक कामावर प्रचंड प्रेम करतो त्यामुळै ते काम त्याला ओझे वाटत नाही व दुसरा त्या कामाचा तिरस्कार करतो म्हणून ते काम त्याला बोझ वाटते म्हणून काहीजण जीवनावर प्रेम करतात तेव्हा त्यांना जीवन वरदान वाटते व काही जीवनात नकारात्मक शोधून जीवनाचा तिरस्कार करतात त्यामुळे प्रत्येक दिवस त्यांना ओझे वाटू लागतात व ते ओझे पेलणे त्यांच्यासाठी फार अवघड होऊन बसते .ओझे वाटायला लागले की मग त्याचा परिणाम मनस्थितीवर होतो व शांती मनातून निघून जाते म्हणून कोणत्या गोष्टीचे ओझे न बाळगता प्रेमाची भावना ठेवली की ते ओझे न वाटता मन एकदम हलके हलके वाटते .जे आपण केले किंवा ज्यांच्यासाठी केले ते त्याचक्षणी विसरून गेले की परत घेण्याची भावना मनात राहत नाही ,नाहीतर ती भावना राहिली की बोझ वाटायला लागते .कुणाकडून अपेक्षा ठेवली की त्या अपेक्षांचे ओझे वाटायला लागते व मग त्रास होतो .मनावर असलेले ओझे बोलून मोकळे करता येते मनात साठवून त्याचे ओझे तयार होते.जेव्हा सारे ओझे उतरले की मग कसे मन हलके होईल.बघूया ओझे होणार नाही अशा भावना दूर करूया व असेल ओझे तर ते खाली ठेवू या.बघूया जमतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment