हा तर स्वत:चाच फायदा
बर्याच वेळेला आपण काही करतो ते दुसर्यावर उपकार करण्यासाठी पण जर थोडा दृष्टिकोन बदलला की लक्षात येईल की आपण जे करतो ते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी. एखाद्या अंध किंवा अपंग व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदत केली तर त्याला झालेला आनंद किंवा त्याच्या मुखातून निघालेला कृतज्ञ भाव आपल्याला आनंद देऊन जातो व त्यामुळे आपले मन प्रसन्न होते मग यात आपला फायदाच झाला की .एखाद्या गरजवंताला पैसेरूपी जेव्हा मदत करतो तेव्हा त्याच्या चेहर्यावर झालेला आनंद आपल्याला समाधान देऊन जातो .भुकेला असलेल्या व्यक्तीला जेव्हा अन्नाचे ताट देतो तेव्हा त्याच्या चेहर्यावर झालेला आनंद आपल्याला सुख देऊन जातो .आपण जेव्हा दुसर्याची प्रशंसा करतो तेव्हा त्याच्या चेहर्यावर आलेले सुखद भाव आपल्यालाही आनंद देऊन जातात म्हणून ज्पा ज्पा वेळी आपण दुसर्यासाठी काही करतो तेव्हा त्यांच्यात उमटलेले भाव प्रतिबिंबित होऊन आपल्यात उमटतात मग चांगले भाव दिले तर चांगले उमटणार किंवा वाईट दिले तर वाईट उमटणार त्यामुळे जे जे आपण करणार त्यात आपलाही फायदा व तोटा असतो .जर फायदाच पाहिजे असेल तर मग दुसर्याच्या फायदाचाही विचार करावा लागेल अशी दृष्टी जेव्हा निर्माण होईल तेव्हा मग मी त्याच्या केले हा अहंभाव निर्माण होणार नाही .आपण जे जे करणार दुसर्यांसाठी मग त्याला जाणीव असो अगर नसो पण आपल्या कर्माचे फळ आपल्याला तर निश्चित मिळणार मग ठरवायचे की आपण काय केले पाहिजे जेणेकरून आपण केलेले कर्मावर आपल्याला पश्चाताप करायची वेळ यायला नको .दृष्टी बदलली की सगळेच समिकरणे बदलतात .बघू या जमतं का आपल्याला
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment